फलटण प्रतिनीधी :- मोजे विडणी येथील फलटण ते पंढरपूर रोडवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगारास फलटण ग्रामीण पोलिसांनी एका गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह अटक केली असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना गोपनिय माहीती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कल्लु बेनकर (रा बावीस फाटा गणेशशेरी धुळदेव ता फलटण जि सातारा) हा मौजे विडणी ता. फलटण येथील फलटण ते पंढरपूर रोडवर बस स्टॉपजवळ उभा आहे. आणि त्याचेकडे गावठी बनावटीचे गावठी कट्टा आहे व तो विक्री करण्याचा पर्यत्न करीत आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जी बी बदने, पो हवा नितीन चतुरे, पो हवा वैभव सुर्यवंशी, पो ना अमोल जगदाळे, पो ना श्रीनाथ कदम, पो कॉ हणुमंत दडस, पो कॉ शिवराज जाधव या पथकास संबंधित ठिकाणी जावुन छापा टाकण्याच्या सूचना दिल्या.
संबंधित पथक माहिती मिळालेल्या ठिकाणी गेल्यावर एक तरुण संशयीतरीत्या वावरताना आढळून आला. त्याला पोलिसांची चाहुल लागल्याने तो पळुन जाण्याच्या पर्यत्नात असताना पो ना श्रीनाथ कदमे यांनी झडप मारुन पकडुन ताब्यात घेतले असता त्याच्या कंबरेला गावठी बनावटीचा कट्टा व त्याच्या खिशातील एक जिवंत काडतुस व एक रिकामी पुंगळी आढळून आली. गावठी कट्टा बाबत पोलिसांनी विचारपुस केली असता त्याच्याकडे भंगार काम करणारा परप्रांतीय कामगाराकडुन घेतलेली आहे असे त्याने सांगितले.
गावठी बनावटीचा कट्टा पोलिसांनी जप्त करुन संशयित आरोपी विरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित आरोपी विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून संबंधित आरोपीकडे फलटण ग्रामीण पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.