येथील एस. टी. स्टॅन्ड पाठीमागे वाकेश्वर रस्त्यावर राहणार्या एका ग्रामीण कारागिराच्या अंदाजे 25 वर्षे वय असणार्या युवकास सुमारास त्रास होऊ लागला. वडूज येथे प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यास भैय्या गाडवे हा मित्र एच. आर. सी. टी. तपासणी साठी सातारा येथे घेऊन गेला. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांच्या डोळ्यात दिवसा काजवे चमकले. त्यातच युवकास घशाचा त्रास होऊन ऑक्सिजनची गरज भासू लागली. त्यादोघांनी ही बाब फोनवरून वडूज येथील तिसरा मित्र ब्रह्मचैतन्य आटो गॅरेजचे बाळा मिस्त्री यास सांगितले. त्यांनी पत्रकार धनंजय क्षीरसागर यांच्या कानांवर ही गोस्ट घातली. क्षिरसागर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंनूस शेख, डॉ. संतोष मोरे, डॉ. सम्राट भादुले यांच्यासह माजी सभापती संदीपदादा मांडवे यांच्याशी संपर्क केला. यावेळी मांडवे हे कोरेगावमध्ये होते. त्यांनी तात्काळ हातातील काम सोडून साताराकडे धाव घेतली. पहिल्यांदा रुग्ण व मित्राची भेट घेऊन मानसिक धिर दिला. त्यानंतर तातडीने जम्बो हॉस्पिटलला जाऊन नंबर लावला अन दुपारी पावणेतीन वाजता ऍडमिशनही झाले. सर्वांच्या तत्परतेने एका गरजूला शासकीय रुग्णालयात आधार मिळाला. अशाच प्रकारे मागील आठवड्यात वडुजमधील एका महिला रुग्णास अडचणी च्या काळात जि. प. उपाध्यक्ष प्रदिपआण्णा विधाते यांच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार मिळवून देण्यास क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.