फलटण प्रतिनीधी - माझ्या बायकोकडे का बघत असतो असे विचारण्यासाठी गेलेल्या तरुणास जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ रोजी रात्री ८:५२ वाजण्याच्या सुमारास मौजे हनुमंतवाडी ता फलटण गावचे हद्दीत असणारे साबळे यांच्या हनुमंतवाडीच्या ढाब्यावर फिर्यादी किरण परमेश्वर पवार (रा पवारवाडी ता फलटण जि सातारा) हे लालासो मच्छिंद्र साबळे ( रा. हनुमंतवाडी ता फलटण जि सातारा) यांना फिर्यादी हे तू माझ्या बायकोकडे का बघत असतो असे विचारण्यासाठी गेले असता लालासो मच्छिंद्र साबळे यांनी फिर्यादीस काय करायचे ते कर असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करून काठीने हाताने लाथा बुक्क्याने मारहाण केली अशी फिर्याद फिर्यादी किरण परमेश्वर पवार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून लालासो मच्छिंद्र साबळे यांच्या विरुद्ध जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.