फलटण प्रतिनिधी :
पिजन फ्लायर असोसिएशन, (इस्लामपूर) प्रस्तुत महाराष्ट्र कबुतर केसरी 2023 आंतरराष्ट्रीय स्तरीय स्पर्धेचे नुकतेच महाराष्ट्र कबुतर केसरी स्पर्धेत फलटणचा डंका : अमित काकडे व सिद्धार्थ अहिवळे विजेते करण्यात आले होते. त्या स्पर्धत महाराष्ट्रातील विविध स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये फलटण येथील
अमित भाग्यवंत काकडे यांना राज्यस्तरीय चतुर्थ क्रमांक मिळालेला आहे. तर जिल्हास्तरीय विभागातून सिद्धार्थ अहिवळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र कबूतर केसरी 2023 स्पर्धेचे स्वरूप प्रथम क्रमांक 4,00001 व मानाची गदा, द्वितीय क्रमांक 2,00001 ट्रॉफी व निशाण, तृतीय क्रमांक 1,00001 ट्रॉफी व निशाण, चतुर्थ क्रमांक 50,001 ट्रॉफीवर निशाण, पाचवा क्रमांक 25,001 या प्रमाणे होते.
त्या स्पर्धत अमित काकडे यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे. तर जिल्हास्तरीय यामधून सिद्धार्थ अहिवळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
पिजन फ्लायर असोसिएशन प्रस्तुत महाराष्ट्र कबुतर केसरी 2023 या स्पर्धे चे बक्षीस वितरण समारंभ व मानसन्मान सोहळा वृंदावण गार्डन मल्टीफ्लेक्स थियेटर जवळ सांगली येथे नुकताच पार पडला. या बक्षीस वितरण समारंभ वेळी स्पर्धकांना व कबुतर प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.