फलटण प्रतिनिधी :
मुधोजी हायस्कूल सन १९८८-१९८९ बॅच इयत्ता १० वी तुकडी-फ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (गेट टूगेदर) रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या निमित्ताने शालेय जीवनातील खास मित्र-मैत्रीणी तब्बल ३४ वर्षांनी एकमेकांना भेटत होते. तिच शाळा, तेच जुने मित्र-मैत्रिणी, तोच वर्ग, तोच बँच, शेजारी बसणारे सवंगडीही तेच आणि तेच शिक्षक. यामुळे भारावलेल्या वातावरणात माजी विद्यार्थ्यांनी खास स्वतःसाठी संपूर्ण दिवस आनंदात घालविला.
कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुनीर तांबोळी याने केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास घनवट याने अत्यंत चांगल्या पद्धतीने केले.
त्यावेळचे शिक्षक चोरमले सर यांचे स्वागत वैशाली कुलकर्णी हिच्या हस्ते तर माने सरांचे स्वागत धनाजी भगत याचे हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबाचे फुल व पेढे देऊन करण्यात आले. त्यानंतर चोरमले सर व माने सर यांनी पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले. फक्त यावेळी हातात खडू, डस्टर, पुस्तक असे काही नव्हते, परंतु अनुभवाची फार मोठी शिदोरी त्यांचेकडे होती. तसेच यावेळी सतीश भांडवलकर, सतीश जामदार, जावेद शेख, शुभांगी कोरडे, यास्मिन पठाण, कल्पना दिक्षीत या विद्याथ्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी मुनीर तांबोळी यांनी सर्वांचे आभार मानले व मुधोजी हायस्कूलमधील सेशन संपले.
त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी सर्वजण कोळकी येथील हॉटेल रेड स्टोन येथे रवाना झाले. तेथे सर्वांनी खूप मौजमस्ती, डान्स, मनोरंजन, गप्पा याप्रकारे एकमेकांबरोबर वेळ व्यतित करून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटूया असा आशावाद व्यक्त करून निरोप घेतला.
हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुनीर तांबोळी, महंमद शेख, धनाजी भगत, वैशाली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.