तरडफ वार्ताहार:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तरडफ ( ता.फलटण ) येथे रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी तरडफच्या सरपंच सरपंच रंजना संपत गोडसे व उपसरपंच रविंद्र शिवाजी पिसाळ यांच्या वतीने रुपये ५१ हजार रुपये व ढाल , व्दितीय क्रमांकसाठी हणमंत शिवाजी पिसाळ ( मुकादम संस्थापक) व राहुल आण्णासो मदने यांच्या वतीने रुपये ३१ हजार व ढाल, तृतीय क्रमांकासाठी सुभाष ढवळे मुकदम व श्रीकांत शेठ फाळके यांच्या वतीने रुपये ३१ हजार व ढाल, चतुर्थ क्रमांकासाठी अनिल शेठ खेडकर यांच्या वतीने रुपये ११ हजार व ढाल, पाचवा क्रमांकासाठी बैलगाडा शर्यत संघटना तरडफ यांच्या वतीने रुपये ७ हजार व ढाल , सहाव्या क्रमांकासाठी संपत नामदेव गोडसे ( संचालक हिंदुस्तान को-ऑपरेटिव बँक) यांच्या वतीने रुपये ५ हजार व ढाल बक्षीसे देण्यात येणार आहेत. तरी बैलगाडा मालक व शौकीनानी सहभागी व्हावे असे आवाहन किरण जगदाळे, वैभव मदने व संयोजकांनी केले आहे.