मराठी पत्रकार दिनानिमित्त शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ जानेवारी 2023 रोजी शिवसंदेशकार मा. आमदार काॅ. कै.हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा फलटण यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकार दिनानिमित्त अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसंदेशकार, माजी आमदार कॉ. कै. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे ( निमंत्रित ) आयोजन दि. २१ व २२ जानेवारी दरम्यान क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेली ९ वर्षे या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून राजकीय नेते, शासकीय अधिकारी / कर्मचारी यामध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती, वन विभाग, बांधकाम, वकील, शिक्षक, पत्रकार यांच्या टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या असून दि. २१ रोजी सकाळी ९ वा. विविध मान्यवराच्या हस्ते होणार आहे. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचा आनंद फलटणकारांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर किर्केट स्पर्धा मुधोजी क्लब मैदान, माळजाई मंदिर शेजारी येथे संपन्न होणार आहेत.