Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आई - वडील व गुरुजनांचा विश्वास जपा : वैभवी भोसले* गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जातसमुह नावात दुरुस्तीसंदर्भात २७ सप्टेंबरला जनसुनावणी सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा 2024 चा निकाल घोषित स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचा विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग ३ मधील गटार सिमेंट पाईपचे काम पूर्ण - नागरिकांनी मा. खासदार रणजितसिंह, आमदार सचिन पाटील यांचे मानले आभार सुरवडीच्या उपसरपंचपदी सुर्यकांत पवार यांची निवड आ. रामराजे व मी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न - मा.आ. दिपक चव्हाण समता घरेलू कामगार संघटना, असंघटित कामगारांसाठी आधारस्तंभ : निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे श्वास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने इंग्लिश स्पिकिंगचे मोफत वर्ग सुरु त्या मामाच्या अपहरण व हत्ये प्रकारणी मोठी माहिती.... वाचा सविस्तर... धक्कादायक - आमदारांच्या मामाचे अपहरण करुन खून डीपीचोरी प्रकरणातील रेकॉर्ड वरील ५ जणांना अटक : डीपी चोरीची कबुली - ग्रामीण पोलिसांची कामगिरी शिवमय वातावरणात आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा ; छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव ज्येष्ठ पत्रकारांना वाढीव पत्रकार सन्मान निधीची रक्कम फरकासह मिळावी : रविंद्र बेडकिहाळ सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे आपली फलटण मॅरेथॉन २०२४ - २५ : रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी निंभोरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास तीन कोटीचा निधी देणार : आमदार सचिन पाटील फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन EVM विरोधात वंचित बहुजन आघाडी उभारणार जनआंदोलन : राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी विनायक मदने यांची निवड उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदान केंद्र क्रमांक 164 मधील मतदानाबाबत समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती* *नागरिकांनी विश्वास ठेवू नये : 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी वृध्द कलावतांनी आधार व मोबाईल लिंक करण्याचे आवाहन आमदार सचिन पाटील आज उत्तर कोरेगाव दौऱ्यावर - मतदारांचे आभार मानणार महात्मा फुले यांना फलटण येथे अभिवादन : मा. खा. रणजितसिंह, आ. सचिन पाटील, श्रीमंत संजीवराजे यांची उपस्थिती आमदार सचिन पाटील यांनी साधला अधिकाऱ्यांशी संवाद शुक्रवारी २९ रोजी राजेगटाचा संवाद मेळावा : पराभवा नंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होण्याची शक्यता आंबेडकरवाद्यांनो सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का ? रामराजेंना फलटणमध्ये धक्का - महायु्तीचे सचिन पाटील विजयी माझ्या आठवणीतील निवडणूक : जाणिवा,संवेदना आणि जबाबदारी - श्रीमती अहिल्या भोजने फलटण विधानसभा मतदार संघात ७१.०५ टक्के मतदान - निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती फलटण मतदार संघात ५ वाजेपर्यंत 214012 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क फलटण मतदार संघात ३ वाजेपर्यंत 164447 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क फलटण मतदार संघात 1 वाजेपर्यंत 114847 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रा.रमेश आढाव यांनी बजावला मतदानाचा हक्क फलटण मध्ये 2 तासात मतदानाचा आकडा पहा फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील शासकीय यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज : सचिन ढोले कमिन्सचा एक रुपया आमच्याकडे आल्याचे दाखवा राजकारण सोडू, पण सिद्ध करता आले नाही तर तुम्ही राजकारण सोडणार का : श्रीमंत संजीवराजे सर्व समाजघटकांचा नियोजन पूर्वक सर्वांगीण विकास अवघ्या ५ वर्षात करणार : ना. अजित पवार प्रचाराच्या तोफा थंडावल्या - आता मूक प्रचार व गुप्त गाठी - भेटी नांदेड मध्ये वंचितच्या सभेला उसळला जनसागर ॲड. प्रकाश आंबेडकर : ओबीसींना डावलनाऱ्यांना, ओबीसींनी डावललं पाहिजे विडणीमध्ये खासदार गटाला झटका - भाजपाचे कार्यकर्ते राजे गटात आ. दिपक चव्हाण यांच्या प्रचाराचा समारोप भव्य प्रचार सांगता रॅलीने सासकलमधून दीपकराव चव्हाण यांना भरघोस मताधिक्य देणार - सासकल ग्रामस्थांचा निर्धार राजेगटाला आरडगाव मध्ये खिंडार : अनेक पदाधिकाऱ्यांनी धरली भाजपाची वाट फलटणच्या प्रचार सभांना विना परवाना गाड्या : निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का?

दुष्काळी भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने तोट्यात

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय : तीसचा पंचवीस रुपयांवर भाव; पशुधन धोक्यात
टीम : धैर्य टाईम्स
माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

दौलत नाईक

दहिवडी : माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

सततचा दुष्काळ, लहरी निसर्गाची अवकृपा त्यामुळे दुधत्या जनावरांसाठी ओला-सुका चारा तयार करताना शेतकरी वर्षभर झटत असतात. यावर्षी माण तालुक्यावर निसर्गाची कृपा होऊन पाऊस समाधानकारक झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी-मका पिकांचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी यावर्षी ज्वारी, मक्याच्या वैरणीच्या गंजी लागल्या आहेत. 

लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी घटली आहे.  शेतकर्‍यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोपासला आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यापर्यंत अगदी तीस रुपयांपर्यंत होते. हा भाव शेतकर्‍यांना परवडत होता. त्यातून दोन पैसे शिल्लक राहून व्यवसायात समाधानी होता. मात्र, हळूहळू दुधाचे भाव खासगी डेअरीकडून कमी करण्यात आले आहेत, हे कमी झालेले भाव शेतकर्‍यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडून जाण्याची गडद भीती निर्माण झाली आहे.

दिवसेंदिवस पशुखाद्याचे भाव गगणाला भिडू लागले आहेत. पशुखाद्याचा रतीब गाईंना लावल्या शिवाय जादा प्रमाणात दूध निघत नाही आणि जनावरांचे आरोग्य संतुलित राहत नाही. दुधाचे भाव घटल्याने पशुखाद्य यामध्ये सरकी, गोळी पेंड, मक्याचा भरडा, ओली व वाळलेली वैरण, औषधोपचार, संगोपन करताना पशुपालक शेतकरी तोट्यात जाताना दिसतोय. जनावरांच्या खुराकासाठी सरकी पेंड 1575 रुपये, गोळी पेंड 1350 रुपये तर मक्याचा भरडा 1050 रुपये, आटा 1000 रुपये, खपरी पेंड 2500 रुपये भावाने प्रती 50 पन्नास किलोची गोणी खरेदी करावी लागत आहे.  

पशुपालकांना दुभत्या जनावरांना दररोज सकस आहार द्यावा लागतो. त्यामध्ये पशुखाद्य, हिरवा चारा, वाळला कडबा यावर इतका सरासरी पावणे चारशे ते चारशे रुपये खर्च होत असतो. जनावरांचा दुभता व भाकड काळ यातील दुधाचे सरासरी प्रमाण प्रतिदिन पंधरा लिटर इतके मानले तर पावणे चारशे रुपये शेतकर्‍यांच्या हातात येतात. दररोज पशुखाद्य सरासरी दहा किलो तीनशे रुपयांच्या घरात जातंय तर 25 किलो वैरण किमान शंभर रुपयांची लागत आहे. त्यामुळे उत्पादन आणि खर्च बघितला तर हा जोडधंदा तोट्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

गाईच्या दुधाचा भाव फॅट, एसएनएफ या निकषावर ठरविला जातो. सध्या 16 एप्रिलनंतर गाईच्या दुधाला फॅट 3.5 एसएनएफ 8.5 या गुणवत्तेला 25 रुपये दर दिला जातोय, या अगोदर याच गुणवत्तेला 30 रुपये दर दिला जात होता. आता प्रती लिटर दुधाला पाच रुपयांची घसरण झालीय. आगामी काही दिवसांत आणखी पाच रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे. मग मे महिन्याच्या सुरवातीला भाव वीस रुपयांवर येईल, असे वर्तविण्यात येत आहे. तसेच फॅट 3.5 एसएनएफ 8.5च्या खाली गुणवत्ता आल्यास प्रती पॉईंट 40 पैसे प्रमाणे दरांची घसरण होत आहे. कमी फॅट, एसएनएफचे दूध शेतकर्‍यांना विक्री करायला व संकलन केंद्र चालकांना खरेदी करायला परवडत नाही.

सध्या 16 एप्रिल पासून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफला 25 रुपये दर झाला आहे, तर कमी म्हणजे 3.0 फॅटला बावीस साडेबावीस रु. इतका दर बसत आहे. हे दर प्रत्येक दहा दिवसानी ढासळू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दर वाढत असतात. दर वाढायचं दूर राहिलं तर टिकून राहायचं सोडाच, दिवसेंदिवस दरात घसरण सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पशुपालक शेतकरी उद्ध्वस्त होऊन जाईल. तळहाताच्या फोडासारखे पशुधन सांभाळताना शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीला येत आहे.


मिल्किंग मशीन, कडबा कुट्टीमुळे वेळ अन् मनुष्यबळाची बचत
शेतकर्‍यांनी अधिक दूध उत्पादनासाठी संकरित गाई पाळल्या आहेत. अधिकतम दूध देणार्‍या प्रजाती विकसित झाल्या आहेत, जादा दूध देणार म्हणल्यावर त्या गाईंना खुराक ही त्या प्रमाणात द्यावा लागत असतो. अनेक पशुपालक शेतकर्‍यांनी पाच व त्यापेक्षा जादा गाईची जोपासना केली आहे. या जनावरांना ओली वाळलेली वैरण तोडून खाऊ घालणे कष्टाचे व जिकिरीचे असल्याने, वैरणीची बचत करणे या अनुषंगाने कडबा कुट्टीचा वापर करण्यात येत आहे. तसेच भरपूर गाई असल्याने सर्व गाईंच्या वेळेत धारा काढणे आवश्यक असते तर त्यासाठी कुशल माणसांची गरज असते. परंतु, दूध धारा काढण्यासाठी पशुपालक सर्रास मिल्किंग मशीनचा वापर करीत आहेत. त्यातून वेळ व मनुष्यबळाची बचत होत आहे. यासाठी शेतकर्‍यांना जादा भांडवल गुंतवावे लागत आहे.     
 
दुधाच्या भावानुसार गाईंच्या किमतीत चढउतार
बाजारपेठेत दुधाचे भाव कसे आहेत, यावर दुभत्या व व्यायला झालेल्या गाईंचा दर ठरत आहेत. दुधाचे भाव खाली आल्यास गाईंचे दर कमी होऊन गाईंची विक्री मंदावते तर दर वाढल्यास गाई शोधून विकत मिळत नाहीत, परिणामी शेतकर्‍यांना गाई खरेदीसाठी व्यापार्‍यांचा आसरा घ्यावा लागत असतो. सध्या गाईंच्या किमती लाखाच्या घरात आहेत. गेल्या दुष्काळाच्या खाईत पशुधन घटले होते. मात्र, अलीकडे पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकर्‍यांकडे स्वतःच्या शेतात चारा निर्माण होऊन पुन्हा पशुधन वाढले आहे.
 
 
दुधाचा दर घसरल्यास व्यवसाय परवडत नाही..
दुग्ध व्यवसाय करायचा म्हटलं की गाई खरेदी करणे, निवार्‍यासाठी गोठा-शेड बांधणे, कडबा कुट्टी, मिल्किंग मशीन, चार्‍याची साठवणूक व तरतूद करणे, पशुखाद्य, मक्याचा भरडा आदीसाठी भांडवल गुंतवावे लागते. दुभती जनावरे अधूनमधून आजारी पडतात. त्यांना महागडा औषधोपचार करावा लागतो. शेतात किमान आठमाही हिरव्या चार्‍याचे नियोजन करून उन्हाळ्यात सुक्या चार्‍याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढालीच्या चार्‍याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढाली करीत असताना दुधाचे दर किमान तीस रुपयांच्या खाली आल्यास शेतकरी तोट्यात जात आहे.
- सुनील खाडे, पशुपालक शेतकरी, पळशी.

संबंधित बातम्या



स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER