Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी रिपाईच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना फलटण येथे अभिवादन प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता : सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड फलटणच्या एका अकॅडमीत विद्यार्थ्याला मारहाण : विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ग्राहक चळवळीत काम करणारांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव : डॉ. विजय लाड किरण बोळे यांना पुरस्काराचे वितरण पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजनबद्दल विडणी चे सरपंच सागर अभंग सन्मानित गं.भा.कै.लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा गुरुवारी 31 जुलै रोजी प्रथम पुण्यस्मरण आमदार सचिन पाटील यांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन : मतदारसंघाच्या समृद्धीसाठी शंभू महादेव चरणी प्रार्थना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर* *- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे कृषी विद्यार्थ्यांकडून डाळिंबावर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे बिबी येथे प्रात्यक्षिक विडणी - धुळदेवचे आजी माजी सदस्यांचा भाजपा प्रवेश - राजे गटाला जोरदार धक्का दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी महायुती सरकार पूर्ण ताकतीने उभे : आमदार सचिन पाटील नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्थेच्या राजाळे येथे वृक्षारोपण - आ. सचिन पाटील यांची उपास्थिती जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी फलटणमध्ये रक्तदान शिबिर जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांचे दुःखद निधन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची फलटणकरांना प्रतीक्षा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात दुसरी : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी स्वीकारला पुरस्कार धुमाळवाडीत पर्यटकांना लुटणा-या टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन अवघ्या आठ तासात पर्दाफाश ! पणन विभागाने सुपर मार्केट गाळा भाडे कमी करणेबाबत निर्देश दिलेस फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस मान्य- श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर नंदकुमार काकडे यांचे निधन बाजार समितीतील गाळे धारकांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश : मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती रिपाई ची राजकीय रणनीती संदर्भात शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी फलटण येथे बैठक : नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणूकीची रणनीती ठरणार बापूसाहेब तथा बी. टी. जगताप यांना राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचे विडमॅट प्रात्यक्षिक फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचे उल्लंघन ? अकॅडमी व्यवसाय उफाळले नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन करणार – सनी काकडे माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे मानेवाडी येथे प्रात्यक्षिक : युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह

राज्यातील फार्मासिस्टच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी वचनबध्द : विजय पाटील

राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांचा गौरीशंकर बी फार्मसीतर्फे सत्कार
टीम : धैर्य टाईम्स
सातारा जिल्ह्यासह राज्यातील महाविद्यालयामध्ये फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उत्कर्षसाठी मी कायम वचनबद्ध असल्याचे मत महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष व पीसीआय नवी दिल्लीचे सदस्य विजय पाटील यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकर ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर लिंब येथील फार्मसिस्ट संपर्क अभियान अंतर्गत सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते.

लिंब (सातारा) : सातारा जिल्ह्यासह राज्यातील महाविद्यालयामध्ये फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उत्कर्षसाठी मी कायम वचनबद्ध असल्याचे मत महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष व पीसीआय नवी दिल्लीचे सदस्य विजय पाटील यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकर ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर लिंब येथील फार्मसिस्ट संपर्क अभियान अंतर्गत सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते.

यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. राहुल जाधव, सातारा जिल्हा फार्मसी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, सावकार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. वसंत लोखंडे, मसूर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रम शिंदे, डॉ. अमित खाडे, कोरेगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय माने, संघटक सचिव सागर भोईटे, स्वप्नील बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

विजय पाटील म्हणाले, औषध निर्माण शास्त्र शाखेत ज्ञान घेणार्‍या विद्यार्थ्यांनी उद्योजगता विकासाचे प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात फार्मासिस्ट अधिक सक्षम करण्यासाठी राज्य फार्मसी कौन्सिल नजीकच्या काळात धोरणात्मक निर्णय घेणार आहे. याचा लाभ राज्यातील सर्व फार्मासिस्टला होणार आहे. त्यांचे हित लक्षात घेऊन संपूर्ण राज्यातील फार्मसिस्टना पूर्णतः घडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

जनसंपर्क अधिकारी श्री. काटेकर म्हणाले, विजय पाटील यांनी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत फार्मसी क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असणारे महत्वाचे बदल करून फार्मासिस्ट व केमिस्ट असोसिएशन मध्ये सुसंवाद व समन्वय साधून अनेक कठीण प्रश्न सोडवले आहेत. राज्यातील फार्मसी घटक अधिक सक्षम व समृद्ध करण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत.

प्राचार्य डॉ. वसंत लोखंडे म्हणाले, औषध निर्माण क्षेत्रातील बदलती समीकरणे व आव्हाने सक्षमपणे पेलण्यासाठी विजय पाटील यांचे नेतृत्व सक्षम आहे. ते स्वतः फार्मासिस्ट असल्याने या क्षेत्रातील असणाऱ्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. गौरीशंकर फार्मसी लिंबचे उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले, मानवी जीवनाच्या आरोग्याशी संबंधित असणारे हे क्षेत्र आता अधिक प्रगल्भ होत आहे. व्यवसाय व नोकरीसाठी याक्षेत्रात  चांगली संधी आहे. फक्त विद्यार्थ्यांना त्याची योग्य ती माहिती मिळणे आवश्यक आहे.

केमिस्ट व फार्मासिस्ट यांचे व्यासपीठ उभारणार :
राज्य केमिस्ट असोसिएशन व फार्मासिस्ट यांचे एक व्यासपीठ उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राज्य फार्मसी कौन्सिल यासाठी पुढाकार घेणार आहे. त्यांना अधिक सक्षम व परिपूर्ण घडविण्यासाठी उद्योजक विकास प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात घडणारे बदल तसेच औषध कंपन्यांचे धोरणात्मक निर्णय याबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र माहिती केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.

प्रारंभी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांचा महाविद्यालयातर्फे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. महेश थोरात, डॉ. भूषण पवार, प्रा. माधुरी माहिती, प्रा. धैर्यशील घाडगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय देशमाने यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER