फलटण प्रतिनीधी:- बारामती ते फलटण बसमधुन फलटण एस.टी.स्टँण्ड येथे उतरत असताना एका महिलेचे एकूण ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या मण्यांमध्ये ओवलेले मणीमंगळसुत्र व मिनी मणीमंगळसुत्र हे बँगमध्ये असलेल्या छोट्या पर्समधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमाराला फिर्यादी पुजा अंकुश वाघ (वय ३१ वर्षे, रा.मोळ, ता.खटाव) या एस.टी.स्टँण्ड फलटण येथे एस.टी.मधुन उतरत असताना गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादीचे २० हजार रुपये किंमतीचे 4 ग्रँम वजनाचे सोन्याचे मणी व ५ ग्रँम वजनाचे सोन्याचे वाटीमधील पदक असलेले काळ्या मण्यामध्ये ओवलेले मणीमंगळसुत्र १० हजार रुपये किंमतीचे अडीच ग्रँम वजनाचे सोन्याचे मणी व दीड ग्रँम वजनाची सोन्याची शिंपल्याच्या आकाराची डोरली असलेले काळ्या मण्यामध्ये ओवलेले मिनी मणीमंगळसुत्र असे एकूण ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या मण्यांमध्ये ओवलेले मणीमंगळसुत्र व मिनी मणीमंगळसुत्र हे बँगमध्ये असलेल्या छोट्या पर्समधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मपोना पूनम बोबडे करत आहेत.