फलटण प्रतिनिधी-
फलटण शहरात पुन्हा एकदा गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार सुरु झाले असून एकाच दिवशी दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत.
याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ रूपाली दिपक जगदाळे वय 45वर्षे, रा.राजलक्ष्मी अपार्टमेंट, सजाई गार्डन शेजारी फलटण या त्यांची मुलगी समीरा हिच्या सोबत गिरवी नाका ते जाधववाडी जाणारे रोडवर गोळीबार मैदान फलटण येथील गिरीधर क्लासेसचे समोरील वृंदावन बंगल्याचे समोर पोहोचले असता समोरून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ येताच, त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे चैनमध्ये असलेले मिनी गंठण हिसकावुन घेवुन ते मोटार सायकलवरून तेथुन पुढे गोळीबार मैदान परिसरात निघुन गेले असल्याची फिर्याद दिली आहे. यामध्ये 60,000/- रूपये किंमतीचे सोन्याचे चैनमधील मिनी गंठण घेऊन चोरट्यानी पोबारा केला आहे. याचा तपास पो.हवा.गणेश सुर्यवंशी करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत बारवबाग लक्ष्मीनगर येथील चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या शेजारी स्वामी हॉस्पीटलचे समोर रोडवर यातील फिर्यादी या त्यांची बहीण राहत असलेल्या बंगल्याचे गेट उघडत असताना सौ.लिलावती सतिश लकडे वय 38 वर्षे, मुळ रा.वडले, ता.फलटण, जि.सातारा सध्या रा.स्वामी विवेकानंदनगर, फलटण, माठीमागुन एका काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून दोन अनोळखी इसम फिर्यादीचेजवळ येताच त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे चैनमध्ये असलेले मिनी गंठण हिसकावुन घेवुन ते मोटार सायकलवरून तेथुन पुढे रिंगरोड फलटण च्या दिशेने निघुन गेले असल्याची फिर्याद दिली आहे अधिक तपासम.पो.हवा.पूनम बोबडे करीत आहेत.