फलटण प्रतिनिधि - बुधवार दी. २० नोव्हेंबर ला आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादिवशी सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे काहीही झाले तरी मी आणि माझे कुटुंबीय आवर्जून मतदान करू आणि आपल्या महाराष्ट्राला आणि परिणामी देशाला सकारात्मक घडविण्यास नक्कीच हातभार लावू असे म्हणतानाच मतदान करुन लोकशाहीचे कर्तव्य बजावा असे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी मतदारांना केले आहे.
लोकशाहीमध्ये योग्य नेता निवडून देण्यासाठी, आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी व आपल्या लोकशाहीचा नागरिक या नात्याने जबाबदारी पाळण्यासाठी आपण मतदान केले पाहिजे असे डॉ. जोशी म्हणतात. तर तुमच्या एका मताने खूप फरक पडतो. मतदान नकेल्याने तुम्ही तुमचा लोकशाहीचा हक्क गमावता असेही डॉ. जोशी म्हणतात. त्यामुळे सर्वांनी मतदान करुन लोकशाहीचा हक्क आणि कर्तव्य बजावा असे आवाहन शेवटी डॉ. प्रसाद जोशी यांनी केले आहे.