Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

सांगवी गावात आदर्श काम केल्याने सनी मोरे यांच्या पत्नी सौ.मनिषाताई मोरे यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी - जनतेतून मागणी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - सांगवी हे गाव नीरा नदीच्या काठी असलेले सुंदर गाव या गावचे सरपंच संतोष उर्फ सनी मोरे तरुण अन् आपल्या गावचा विकास करण्यात अगदी यशस्वी झाल्याचे पहायला मिळते या मुळे विडणी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या सौभाग्यवती सौ. मनिषाताई मोरे यांच्या उमेदवारीची मागणी संपूर्ण जिल्हा परिषद गटातील मतदारांनी केली आहे.

     सांगवी ता.फलटण गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथे अतिशय सुंदर असे नियोजन करीत गावाचा सर्वांगीण विकास केला आहे.जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला आहे तसेच गावातील रस्ते,गटार त्याचबरोबर स्वच्छता याचबरोबर विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून गावचा विकास केल्याने त्यांच्या सौभाग्यवती सौ मनिषा ताई संतोष उर्फ सनी मोरे यांना जिल्हा परिषदेत पाठवावे अशी मागणी करण्यात आली आहे.


     सांगवी येथील ग्रामपंचायत च्या माध्यमातून ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या मासिक बैठका बोलावणे व त्यांचे अध्यक्षपद भूषवणे असे न करता त्या ठिकाणी 

विकास कामे करण्यात सनी मोरे यशस्वी झाले आहेत,गावातील रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि दिवाबत्ती यांसारख्या विकास योजनांची अंमलबजावणी करीत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे,

सांगवी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे तसेच त्यांच्या माध्यमातून लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात ते यशस्वी झाले आहेत, ग्रामपंचायतीचे दस्तऐवज (Records) सुरक्षित ठेवणे यास प्राधान्य दिले,शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य समजून त्यातून हजारो ग्रामस्थांना त्यांनी मदत केली आहे.


     सांगवी गावात जन्म,मृत्यू आणि विवाह यांची नोंद ठेवणे त्याचे वेळेत दाखले दिले जातात,तसेच कर वसुली करणे आणि त्यातून गावविकासाची कामे करणे या बाबतीत सनी मोरे यांनी इतर सरपंच लोकांना एक आदर्श दिला आहे,फलटण पंचायत समितीच्या मंजुरीने योजनांना पुढे नेणे यासाठी त्यांनी वेळोवेळी शासकीय योजनांचा पाठपुरावा केला, सरपंच हे गावाच्या विकासाचे प्रमुख आणि केंद्रबिंदू असतात असे मानून ते ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तीच्या पत्नी सौ मनिषा ताई मोरे यांना नेत्यांनी जिल्हा परिषदेत पाठवावे अशी मागणी केली आहे.सनी मोरे हे जनतेच्या समस्या थेट सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि शासकीय कामांमध्ये दोन पावले पुढे येत जनतेची सेवा करतात त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती सौ मनिषा ताई मोरे यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER