फलटण प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या अध्यक्ष पदी विवेक दशरथ गायकवाड फलटण यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेने पुणे येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनें पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी राजेशजी जाधवर, सहनिबंधक लेखापरीक्षक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, सुभाषजी मोहिते अध्यक्ष पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन,
डॉ. अनिलजी कारंजकर सेक्रेटरी आय एस एस सी यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व मान्यवरांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उपसमित्या नेमण्यात आल्या यामध्ये सातारा जिल्ह्य अध्यक्ष पदी विवेक दशरथ गायकवाड फलटण, उपाध्यक्ष पदी कमलेश पाचपुते कराड , सचिव पदी अरविंद पाटील सातारा यांची नेमणूक करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी केले होते.