फलटण प्रतिनिधी :
जालना येथे झालेल्या मराठा समाजवरच्या लाठीहल्ला बाबत संभाजी ब्रिगेड च्या वतीने मा. तहसीलदार फलटण यांना निवेदन देण्यात आले.
जालना येथे मराठा समाजाच्या वतीने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार समाज बांधव आंदोलन आमरण उपोषण करत होते. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी शासनाचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी येऊन आंदोलन पाठीमागे घ्या सांगत होते.
आंदोलक महिला पुरुष तरुण-तरुणी यांच्यावरती अतिरेकी असल्याप्रमाणे लाठी चार्ज करून अमानुष हल्ला चढवला याबाबत पोलीस प्रशासनाचे अधिकारी अशाप्रकारे वागवत आहे त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे व समाजाचा आरक्षणाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा मराठा समाज पुन्हा एकदा अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करताना पुढील काळात दिसेल याची राज्याचे प्रमुख म्हणून नोंद घ्यावी असे निवेदनात संभाजी ब्रिगेड यांनी म्हणले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड चे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे प्रदीप घाडगे किशोर शिंदे मंगेश गायकवाड बजरंग भगत सुबोध शिर्के बाबुराव जगताप इत्यादी उपस्थित होते.