Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - विडणी गावातील ज्येष्ठ नेत्यांनी शिक्षण संस्था व इतर माध्यमातून गावाला योग्य विचार दिला. त्यांनी गावाचा जो पाया रचला त्या पायावरच चांगली इमारत उभी राहत आहे. त्या विचारावरच आपण व आपले सहकारी कार्यरत असून गावामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या दोन स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संधीचे सोने करावे, असे आवाहन उपमुख्य उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव धीरज अभंग यांनी केले.


विडणी गावचे ग्रामदैवत कालभैरवनाथ यात्रेचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी नूतनीकृत केलेल्या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा व मोफत आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जे. टी. पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमिता गावडे, अंकुश नाळे, प्रा. के. ननावरे, प्रा. डी. एन. शिंदे, सरपंच सागर अभंग, अमोल अभंग, अनिल शेंडे, डॉ. प्रवीण अभंग, कुंदन शेंडे, योगेश इंगळे, प्रदीप शिंदे यांचे प्रमुख उपस्थिती होती.


धीरज अभंग म्हणाले, मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला. सर्वांनाच अभ्यासासाठी मोठ्या शहरात जाता येत नाही. तो संघर्ष पुढील विद्यार्थ्यांना करावा लागू नये म्हणूनच विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये अभ्यास करताना आजपर्यंत एकूण २३ विद्यार्थी विविध स्पर्धातून विविध क्षेत्रात नियुक्त झाले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच गावातील माझे सहकारी अधिकारी यांच्यावतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतूने 'उमेद' चॅरिटेबल ट्रस्टची संकल्पना आहे भविष्यात लवकरच ती कार्यान्वित होईल.



डॉ. पोळ म्हणाले, विडणी गावातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध करून देत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अधिकाऱ्यांचा गाव म्हणून या गावाची ओळख निर्माण झाली असून धीरज अभंग व त्यांचे सर्व सहकारी विविध उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत हे निश्चितच

कौतुकास्पद आहे. विद्याथ्यर्थ्यांनी शरीर स्वस्थ ठेवायचे असेल तर सर्वच व्यसनापासून दूर राहावे. धावत्या जीवनशैलीमध्ये ताण-तणावापासून दूर राहायचे असेल तर संतुलित आहार, व्यायाम व योगासने यावर लक्ष द्यायला हवे.


यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने विविध भाग शाळांना वॉटर कुलर प्युरिफायरचे वाटप, विविध पदांवर नियुक्त झालेले मयूर नाळे, विदुला देशपांडे, डॉ. हिमांशू बोडरे या अधिकाऱ्यांच्या व सरपंच सागर अभंग यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांना मोफत लस्सीचे वाटप करण्यात आले. प्रा. सचिन अभंग यांनी प्रास्ताविक केले. सचिन अभंग यांनी स्वागत केले. रवींद्र परमाळे यांनी सूत्रसंचालन केले.


लवकरच डॉल्बी बंदीचा निर्णय
 सरपंच सागर अभंग म्हणाले, गावामध्ये सर्वांच्या सहकार्याने मुलींसाठी नव्याने सुरू केलेली सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आनंद वाटत आहे. दुर्दैवाने यावेळी यात्रेनिमित्त डॉल्बीचा दणदणाट खूपच होता. दरवर्षी लाखो रुपयांचे उधळण या डॉल्बीवर होत आहे. गावातील अनेक विचारवंत व ग्रामस्थांच्यावतीने याविषयी वारंवार नाराजी व्यक्त होत असून यात्रा कमिटी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच डॉल्बी बंदी, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेण्यात येईल असे सांगितले.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER