धैर्य टाईम्स - दि. १० मे २०२५
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलेल्या सुचनेनुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार रविवार दि.११/०५/२०२५ सकाळी ९ वाजता फलटण तालुक्यातून 'ऑपरेशन सिंदूर ला समर्थन देणेकामी व आपल्या सैनिकांना पाठबळ देण्यासाठी फलटण शहरामध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
रविवार दि.११ रोजी सकाळी ९.०० वा. तहसिल कार्यालय, फलटण येथून तिरंगा रॅलीची सुरवात होणार असून रॅलीचा मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे.
तहसिल कार्यालय परिसर येथून सुरवात महात्मा फुले चौक - महात्मा गांधी पुतळा (गजानन चौक) - उमाजी नाईक चौक - महावीर स्तंभ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - पुन्हा परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - महावीर स्तंभ - डेक्कन चौक - महात्मा फुले चौक - तहसिल कार्यालय परिसर या पद्धतीने रॅलीचा मार्ग असून सदर तिरंगा रॅलीस फलटण शहरातील व फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.