Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस : बिरदेव डोणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल तालुक्याचा विकासाचा बॅकलॉक भरून काढणार - मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर शहराचा पारा ४२ पार ? प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ ; प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही सूचना नाहीत फलटण तालुका भाजपा मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर : अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विकास उर्फ बापूराव शिंदे यांना संधी डॉ. आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाला विलंब का ? आंबेडकरी अनुयायांचा प्रश्न डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी वाचनालयास पुस्तके भेट पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी - उपमुख्यमंत्री अजित पवार समोसे, जिलेबी, कचोरीला इंग्रजीत काय म्हणतात? खूप कमी लोकांना ठाऊक आहे इंग्रजी शब्द... चला तर मग गॅलेक्सीच्या चेअरमनपदी सचिन यादव तर व्हॉइस चेअरमनपदी योगेश यादव ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांचा उद्या साताऱ्यात गौरव समारंभ फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव हातचालखीने ए.टी.एम.कार्डचा वापर करुन पावणे दोन लाखाला गंडा फलटण शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार विविध समाजाने एकमेकांकडे पाहताना दृष्टिकोन बदलावा - सचिन मोरे कु. अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहिर तंत्रज्ञानाच्या युगात सावधान... MS-CIT शिकायचं आहे ! अधिकृत सेंटरलाच प्रवेश घ्या भीमज्योत घेऊन महिला धावणार - निंभोरे ते मुंजवडी भीमज्योतीचे आयोजन पिंपरद (ता. फलटण )येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन पदर आईचा अन् आयुष्याचा.... युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद : वापरकर्त्यांकडून प्रचंड तक्रारी महात्मा फुले यांना जन्मदिनानिमित्त तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडून अभिवादन फलटण येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉ. आंबेडकर जयंतीमंडळाच्या वतीने अभिवादन सांधे - दुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार : प्रसिद्ध अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ प्रसाद जोशी DD संह्याद्रीवर थोर समाज सुधारक - महात्मा जोतिबा फुले फलटण येथे भगवान महावीर जयंती उत्साहात संपन्न - आमदार सचिन पाटील यांनी केले अभिवादन बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आमदार सचिन पाटील टंचाई भागातील गावे पाण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी -पालकमंत्री शंभूराज देसाई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजन फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.नितीन जाधव तर सचिवपदी ॲड. निलेश भोसले मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी आर्थिक सहाय्यासाठी 7 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणेबाबत आवाहन डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील - उद्योग मंत्री उदय सामंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी एमएच-11 डि व्ही मालिका सुरु ; शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा जिवंत सातबारा मोहीम फलटण तालुक्यात प्रभावीपणे राबविणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव फलटण येथील प्रभाग ९ येथे पाहणी दौरा : प्रभागासाठी 50 लाख रूपये व नविन नाट्यगृहा साठी 8 कोटी रूपये मंजुर ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव : वारे व पावसात महावितरण ची यंत्रणा कोलमडली डॉ. आंबेडकर जयंती मंडळाकडून इफ्तारचे आयोजन : दलित मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन 1 एप्रिल रोजी सासवड येथे विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ - श्रीमंत रामराजे यांची प्रमुख उपस्थिती मनोज मारुडा यांची जिल्हास्तरीय समिती सदस्यपदी निवड आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस फलटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार : माजी आमदार दिपकराव चव्हाण महात्मा बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आवारातील गाळे भाडेतत्वावर - इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील अक्षय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सर्व अधिकार मिळवून देणार - जिल्हाधिकारी संतोष पाटील विजयकृष्ण थोरातने आर्चरी स्पर्धेत पटकावले ब्राँझ मेडल

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांविषयक धोरण

प्रा.डॉ.सुभाष वाघमारे ; छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा
टीम : धैर्य टाईम्स

आज ६ डिसेंबर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. या दिवसाच्या निमित्ताने बाबासाहेब यांच्या विविध विचार आणि कार्यावर जगभरात चिंतन केले जात आहे. केवळ ‘दलितांचे कैवारी नेते’ म्हणून काहींनी त्यांच्या व्यापक कार्याला दुर्लक्षित केले. पण आज वर्तमानकाळात असे जाणवत आहे की बुद्धीप्रामाण्यवादी आणि लोकशाहीचे निष्ठावंत समर्थक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील आणि जगातील सर्व माणसांच्या कल्याणाचा मार्ग दाखवला आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आपले सारे आयुष्य हक्क व न्याय यासाठी संघर्ष करण्यात घालवले आहे. देशातील तत्कालीन अस्पृश्य वर्गात जन्म घेतलेल्या बाबासाहेबांनी आपले सारे जीवन वंचित आणि स्त्रिया यांच्या न्यायासाठी दिले आहे आहे.बहिष्कृत असलेल्या वर्गाच्या न्यायासाठी १९२० ला बहिष्कृत परिषद होते तिथून ते ६ डिसेंबर १९५६ पर्यंतचा बाबासाहेब यांचा सारा
अवकाश पाहिला तर शिक्षण,न्याय हक्क,आणि माणुसकीसाठी व्यापक वातावरण तयार करण्यात त्याचे जीवन समर्पित झाले आहे. ९ मार्च १९२४ ला बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून त्यांनी लोकांना शिक्षण द्या,न्याय हक्क मिळविण्यासाठी संघटीत व्हा, आणि संघर्ष करा हे धोरण त्यांनी अवलंबले. अस्पृश्यतेच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी लोकांना जागरूक केले. जातीभेदामुळे रोटी बेटीचे व्यवहार होत नाहीत ही या देशात मोठी विषमता आहे हे त्यांना जाणवले. अस्पृश्य असलेल्या जातीत देखील रोटी बेटी व्यवहार होत नाहीत ही खंत त्यांना होती.आपली उन्नती दुसरयावर विसंबून करता कामा
नये.आपणच प्राणपणाने लढून आपले हक्क मिळविले पाहिजेत हे त्यांचे धोरण राहिले.आपण दरिद्री असलो तरी थेंबे थेंबे तळे साचे हा आशावाद घेऊन आपल्यात सुधारणा केल्या पाहिजेत हा त्यांचा निर्धार होता.बेळगावी निपाणी परिषदेत त्यांनी सत्याग्रह
करून’ घनघोर संग्राम केला तरच माणुसकी मिळेल’ असे म्हटले होते.ईश्वरवादी व परंपरावादी न होता माणसाने जगले पाहिजे असे त्यांना वाटे. याच सभेत मुलीना मुरळ्या करून त्यांच्या कमाईवर संसार चालवू नका असे त्यांनी सांगितले होते. बोर्डिंग
काढून शिक्षण द्यावे हा विचार त्यांनी तेंव्हाच मांडला आहे. रहिमतपूर येथील महार परिषदेत ‘अस्पृश्य वर्गाने सत्ता व संपत्ती मिळविली पाहिजे’ हा विचार त्यांनी मांडला.इतर जाती अस्पृश्यांची दिशाभूल कशी करतात याबाबतीत त्यांनी लोकांना सजग केले होते. मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे असे सांगून बाबासाहेबांनी आपण समाजाची जबाबदारी घेत आहोत हे दाखवून दिले होते.महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी ब्रिटीश सरकारच्या लष्करात काम करताना जितके स्वातंत्र्य होते तसे पुढे राहिले नाही ही खंत बोलून दाखवली होती. ब्रिटीश सरकार मुलगी अगर मुलास शिक्षण देत होते. गोपाळबाबा वलंगकर यांनी दीनबंधुतून जागृती केल्याचे बाबासाहेब सांगतात. शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यासाठी माणुसकी विकणे ही गोष्ट लाजिरवाणी आहे असे ते सांगतात. जागृतीचा विस्तव तुम्ही विझू देऊ नका हे त्यांचे सांगणे होते. लहान वयात मुलींची लग्ने करू नयेत त्यांना मुलाबरोबर शिक्षण दिले पाहिजे हा ठराव त्यांनी महाड येथे केलेला आहे. आत्मोद्धार हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो जो ज्याचा त्याने करायचा असतो हे त्यांचे विधान स्त्रियांना देखील लागू होते. या पुढे सत्यग्रहात येताना बायका मुलांची
काळजी करणार असाल तर मुळीच येऊ नका असे ते म्हणाले. ‘अस्पृश्यता आपल्या आई बहिणीवरील कलंक आहे. आपण कोणापेक्षाही कमी नाही,कोणतीही स्त्री दुसरया स्त्रीपेक्षा श्रेष्ठ नाही ‘’असे विधान त्यांनी डेव्हिड मिल चाळीत केले होते.
बहिष्कृतातील सुशिक्षित स्त्रियांनी आपले शील व कर्तव्ये सांभाळून समाजाच्या प्रगतीस हातभार लावला पाहिजे हे त्यांचे मत होते. एक धर्मीय म्हणून देखील समानता समाजात नाही याचा संताप त्यांच्या मनात होता.अस्पृश्यतेमुळे देशाचे नुकसान झाले हे
त्यांना जाणवत होते. वीर पत्नी विदुला हिने आपल्या पुत्रास सांगीततले होते की ‘,अंथरुणात पडून कुजत किंवा शंभर वर्ष निरर्थक जीवित घालविण्यापेक्षा घटकाभर पराक्रमाची ज्योत दाखवून मेलास तरी बरे,असेच दरेक अस्पृश्य मातेने आपल्या पुत्रास सांगण्याची वेळ ठेपली आहे’’ अशी उदाहरणे बाबासाहेब यांनी अमरावती येथील अधिवेशनात दिली आहेत .यातून स्त्रीने सामर्थ्यशाली व्हावे हे ध्वनित होते.अस्पृश्यता निवारणासाठी प्राण खर्ची घालण्यासाठी ते आवाहन करतात. २५,२६ व २७ डिसेंबर १९२७ रोजी सत्याग्रह झाला. फ्रांस ची क्रांती झाली त्यात १७ कलमे होती.त्यातील सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची
आहेत व मरेपर्यंत ती राहतील हे वाक्य त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. २५ डिसेंबर १९२७ ला रात्री ९ वाजता बापूसाहेब सहस्त्रबुद्धे व पाच सहा अस्पृश्य साधुनी मनुस्मृतीचे दहन केले. २७ डिसेंबर हा दिवस फारच महत्वाचा आहे.
बाबासाहेब यांना पाहण्यास स्त्रियांची मोठी गर्दी झाली होती. त्या दिवशी स्त्रियांना उद्बोधन करताना ते म्हणाले ‘’संसारातल्या अडचणी स्त्री पुरुष मिळून सोडवता तसे तुम्ही समाजाच्या संसारच्या अडचणी दोघांनी मिळून सोडवल्या पाहिजेत.तुम्ही स्त्रियांनी आम्हा पुरुषांना जन्म दिला आहे.ब्राह्मण स्त्रियात जेवढे शील आहे तेवढे तुमच्यात आहे.पातिव्रत्य आहे ,मनोधैर्य ,करारीपणा आणि धमक आहे.असे असूनही तुमच्या पोटी जन्मलेल्या बालकाला अवमानिले जाते.म्हणूनच समाज उन्नती करण्याचा निश्चय जसा पुरुष करतात तसा तुम्ही केला पाहिजे.जुन्या गलिच्छ चालीरीती सोडल्या पाहिजेत.वरिष्ठ बायका लुगडी
नेसतात तशा तुम्ही नेसा. भाराभर कथलाचे व चांदीचे गोठ पाटल्या घालण्यापेक्षा चांगले कपडे घाला.दागिने घालायचे असतील तर सोन्याचे घाला.स्वच्छ रहा.तुम्ही घरच्या गृहलक्ष्मी आहात अमंगल घडणार नाही याची काळजी घ्या. मेलेले मांस घरात
आणले जाणार नाही असे करा.मुलीना शिक्षण दिले पाहिजे.ज्ञान आणि विद्या पुरुषासाठी नाहीत तर स्त्रियांना देखील त्या आवश्यक आहेत. पूर्वी पलटण मध्ये असलेले लोक मुलीना शिक्षण देत होते. तुमची पुढची पिढी सुधरावयाची असेल तर मुलीना शिक्षण द्या. बाबासाहेब यांच्या भाषणाने त्या सभेस आलेल्या सर्व स्त्रियांनी लगेचच आपले लुगडे नेसण्यात बदल केले होते. स्त्रिया स्वाभिमानी ,सुशिक्षित समतावादी,सत्याग्रही व ज्ञानी बनवण्यासाठी बाबासाहेबांचे हे भाषण प्रेरक ठरले आहे आहे. हे भाषण ऐतिहासिक महत्व असणारे आहे. १२ जानेवारी १९२८ ला त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तिनाथाची यात्रा झाली यावेळी देखील स्त्रियांची संख्या वाढलेली दिसते. बेळगाव परिषदेत मुलाचे वय २० व मुलीचे वय १६ असल्याशिवाय लग्न करू नये असा एक ठराव करण्यात आलेला दिसतो.कोणत्याही जातीच्या स्त्री पुरुषास मिश्र विवाह करण्याची मोकळीक असावी हा विचार परिषदेत
झाला.मुला इतकेच मुलीला शिक्षण द्यावे ही भावना बाबासाहेबांची होती. स्वावलंबन आणि स्वाभिमान या गोष्टीना बाबासाहेब खूप महत्व देतात. रचनात्मक कार्यात स्त्रियांचे योगदान त्यांना हवे होते. स्त्री मुक्तीची भूमिका त्यांच्या धोरणात आहेच पण स्त्री व पुरुष हे मित्रत्वाने रहावेत ही भूमिका त्यांची अधिक आहे. पारंपरिक शिक्षण नको.स्त्रीने देखील पुरुषांचे गुलाम राहू नये. तिने स्वतंत्र ध्येय ठेवावे .प्रत्येक प्राणीमात्रास जगण्याचा अधिकार आहे हे ते सांगत होते. मनुस्मृती ग्रंथात स्त्रियांचा पदोपदी अवमानआहे, म्हणूनच विषमता जोपासणारी मनुस्मृतीचे दहन हे स्त्रियांना गुलामगिरीत ठेवणाऱ्या प्रवृत्तीचे दहन आवश्यक होते. स्त्री मुक्तीचे महत्वाचे पाऊल होते. स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा व सन्मान यांना त्यांनी खूप महत्व दिले गौतम बुद्ध,कबीर,जोतीराव फुले यांचा समतेचा विचार ते कृतीने पुढे नेत होते. वैज्ञानिक दृष्टी त्यांच्या आचरणात आपल्याला दिसते. अन्याय करणारापेक्षा अन्याय
सहन करणारा दोषी असतो. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल हे त्यांचे विधान स्त्रियांच्या चळवळीस देखील प्रेरणादायी ठरले आहे.प्रज्ञा ,शील ,करुणा,चारित्र्य या गोष्टी पुरुष असो की स्त्री दोघांना आवश्यक आहेत तेच त्यांचे म्हणणे होते. प्रस्थापित व्यवस्था ही पुरुष प्रधान आहे,तिच्यात अनिष्ट घातक परंपरा आहेत. अंधश्रद्धा आहेत. मनुस्मृतीने स्त्रियांचे मानवी हक्क नाकारले आहेत पती पत्नीला गहाण देखील ठेवण्याची विकृती देखील होती. तिला व्यक्तिगत संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता,जोडीदार निवडण्याचा अधिकार नव्हता ,स्त्री अपवित्र असते असा भ्रम समाजात होता. बाल विवाह, जरठ विवाह,परित्यक्ता जीवन,सती प्रथा,अन्याय कारक बंधने होती यातून स्वतंत्र जीवन जगण्यासाठी बाबासाहेब स्त्रियांच्या न्यायासाठी बोलत राहिले. तिचे हक्क तिला मिळतीलच यासाठी संघर्ष करीत राहिले आहेत. १४ ओगस्ट १९३१ रोजी
स्त्रियांना बोलत असताना ते बोललेत की ‘’पुरुष वर्गाला त्यांच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव करून द्यावयाची मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर आहे.भावी पिढीला आजच्या झाली त्यात गुलामगिरीचा मागमूसही दिसणार नाही अशी अलौकिक स्वार्थ त्यागाची कामे अगदी निर्भयपणे तुम्ही करावयास सज्ज झालात की माझ्या कार्याची जबाबदारी आपोआपच पार पडल्याचे पुण्य तुम्हास मिळेल देवालयात गेल्याने आपली प्रगती होणार नाही हे त्यांना माहित होते. धर्म भोळेपणाने स्त्री -पुरुष मागे असल्याचे त्यांना जाणवत होते. १९३५ ला विषमता धर्म नाकारून धर्मांतर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. १६ जून १९३६ रोजी पोयबावडी येथील दामोदर हॉलमध्ये जोगतिनी,देवदासी,मुरळ्या इत्यादी देवाला वाहिलेल्या स्त्रियांची सभा झाली. त्या सभेस उपस्थित राहून बाबासाहेब यांनी त्यांना खूप चांगला उपदेश केला. ते म्हणाले होते की धर्माच्या नावाखाली अनैतिकतेने तुम्ही देह विक्रय करून जगत आहात. तुमचा स्वाभिमान लुप्त झाला आहे. आपण धर्मांतर करत आहोत ते दुर्गंधीच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी.सर्वाना समतेचे बंधुत्वाचे व स्वाभिमानाचे आदर्श जीवित लाभावे यासाठी.तुम्ही प्रथम हा आपला दुर्गंधीत आयुष्यक्रम सोडून दिला पाहिजे. आमच्या बरोबर यायचे असेल तर काया वाचा मने शुद्ध व्हा.नाहीतर आमच्या बरोबर येता येणार नाही. आपल्या मुलाबाळांचा नाव लौकिक स्त्रियांच्या शीलावर अवलंबून आहे.असे सांगून त्यांनी तिथे द्रौपदीची गोष्ट सांगितली होती. दुर्योधन तिला म्हणाला होता ,तुझ्या मूर्ख नवऱ्याला सोडून माझ्याबरोबर रहा त्यावेळी ती म्हणाली होती की जर मला नीतीने जगता येत नसेल तर मला ऐश्वर्य नको. राजवाड्यात राहण्यापेक्षा मी नीतीने कष्टमय वनवास सहन करेन’’.तुम्ही गलिच्छ धंदे सोडा असे ते म्हणाले.स्त्रिया असतील किंवा पुरुष दोघांनी नीतीने रहावे. कष्ट करून सन्मानाने जगावे ही त्यांची अपेक्षा होती. यातून बाबासाहेबांनी काय पद्धतीने जीवन जगावे हे स्पष्ट केले आहे. १९२८ मध्ये बॉम्बे कौन्सिलचे मेंबर असताना ,महिलांचे शिक्षण,प्रसूती काळात त्यांना भर पगारी रजा.त्याच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितता याबाबत त्यांनी भूमिका घेतलेली होती. महिला पुरुषाच्या गुलाम नाहीत मैत्रीण आहेत अशी त्यांची भूमिका राहिली आजही जगातील सर्व स्त्रिया हीच भूमिका योग्य मानत असतात. २० जुलै १९४२ चे नागपूर येथील वुमेन्स कॉन्फरन्स मध्ये त्यांनी २०- २५ हजार स्त्रिया जमल्याचे पाहून खूप आनंद व्यक्त केला. ते म्हणालेत की स्त्रियांच्या संघटनेवर फार विश्वास ठेवणारा माणूस आहे. स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो. स्वच्छ रहा. सर्व दुर्गुनापासून मुक्त रहा.मुलांना शिक्षण द्या.ते थोर पुरुष होणार आहेत हे बिंबवा. आर्थिक दृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांच्यवर लग्न लादु नका. अति मुले होणे हे दुष्ट कृत्य आहे. आपल्याला मिळू शकली नाही त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती मुलाला देणे हे
आपले कर्तव्य आहे .सर्वात अधिक महत्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलामासारखे वागण्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा ‘’ बाबासाहेब यांचे हे विचार वैश्विक आहेत. वर्तमानकाळात कोणत्याही देशातील लोकांना ते मार्गदर्शक आहेत. ३० जानेवारी १९४४ ला भारतीय शेड्यूल्ड कास्टचे दुसरे अधिवेशन कानपूर येथे भरले तिथे महिला कमी उपस्थित होत्या .त्यावेळी आमच्या महाराष्टात स्त्रिया हजर राहतात, आमच्याकडे गोषा किंवा पडदा ठेवीत नाहीत पती पत्नी दोघेही समाज कार्यात भाग घेतात.तसे केल्याशिवाय
तुमचा उद्धार होणार नाही असे ते सुरुवातीस सांगतात. उत्तर पट्ट्यातील स्त्रियांना देखील ते जागरूक करतात.
एकीकडे भारतीय संविधानाची निर्मिती होत असताना बाबासाहेब यांनी हिंदू कोड बिल मसुदा १२ ऑगस्ट १९४८ ला कायदे मंडळाबरोबरत मांडले. २५ फेब्रुवारी १९४९ ला भारत सरकार तर्फे बिलाचे विधेयक तयार आले.सामाजिक विषमता ,अनिष्ट प्रथा ,आणि अमानवी नियमांचे समूळ उच्चाटन हाच मुख्य उद्देश बिलाचा होता. हिंदू कोड बिल म्हणजे भारतीय स्त्री मुक्तीचा जाहीरनामाच होता.स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री बाबासाहेब आंबेडकर यांनी २१ सप्टेंबर १९५१ ला हिंदू कोड बिल मांडले.
सनातनी ,पुरानमतवादी वृतीमुळे हे विधेयक मंजूर झाले नाही. त्यामुळे त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला .१९४७ ते १९५१ या चार वर्षात परिश्रम घेऊन स्त्रियच्या न्यायासाठी तरतूद बिलामध्ये होती. भारतीय राज्यघटनेने भेदभाव संपवला होता तरीही त्याला सुसंगत असलेले हे बिल मंजूर ,होऊ शकले नाही. यातून हे समजत होते की संविधान व कायद्याचे राज्य असूनही समाजव्यवस्थेत धर्माचे असलेले वर्चस्व ,आणि त्या गुलामगिरीत असलेले स्त्रियांचे जीवन यांना समानतेने जीवन जगू देण्यास परंपरा आणि तिची मानसिकता तयार नव्हती. हिंदू कोड बिल स्त्रियांना पुढील अधिकार देणार होते १ स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार २ नवरयाने घटस्फोट दिला तर पोटगी मिळण्याचा अधिकार ३ व्यक्तीला एक विवाह झाला असल्यास दुसरा विवाह करण्यास प्रतिबंध ४ स्त्रीला दत्तक जाण्याचा व घेण्याचा अधिकार ५ स्वतःच्या मिळकतीवर स्त्रीचा स्वतःचा
अधिकार ६ वडिलांच्या मिळकतीत मुलाबरोबर मुलीचा देखील अधिकार ७ मुलीना वारस होण्याचा अधिकार ८ मुलीना आंतरजातीय विवाह करण्यास कायद्याने मान्यता ९ स्त्रीला स्वतःचा वारस नेमण्याचा अधिकार ..असे अनेक हक्क या बिलात होते. स्त्रियांना वैचारिक ,आर्थिक ,सामाजिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य देणारे हे विधेयक होते .या बिलाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता.यात श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी देखील विरोध करून सर्व लोकावर हे थोपू नका म्हणाले. हिंदू समाज या बिलाने तुटेल असे आरोप करण्यात आले.नाज्रुद्दिन अहमद यांनीही एकत्र कुटुंब पद्धती धोक्यात येईल म्हणून विरोध
केला .शामा प्रसाद मुखर्जी काही हिदुत्व वादी स्त्रियांना घेऊन संसदेच्या बाहेर निदर्शने केली.बाबू नारायण सिंह ,श्याम नंदन सहाय हे लोक प्रमुख विरोधक होते.समाजातून विविध ठिकाणाहून होत असलेला विरोध पाहून सरकारने हिंदू कोड बिल मागे
घेतले .जवाहरलाल नेहरू देखील या वेळी मागे सरले. सप्टेबर मध्ये राजीनामा पत्र दिले आणि १० ऑक्टोबर १९५१ मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल जरी त्यावेळी मान्य झाले नाही तरी पुढे तेच विधेयक चार विविध कायदे करून सरकारने मंजूर केले. १ हिंदू विवाह विषयक कायदा २] हिदू वारसा हक्क कायदा ३ ]हिंदू दत्तक विधान व पोटगीविषयक कायदा ४ हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा अशा चार कायद्यात बाबासाहेबांनी स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी ज्या तरतुदी केल्या त्या मंजूर झाल्या. हिंदू कोड बिल सारखे आधुनिक कायदा करत असताना प्रखर विरोध बाबासाहेबांनी सहन केला,पण संसदेत ते बिल मंजूर झालेच पाहिजे हा त्यांचा निर्धार होता.यातून त्यांचा पुरोगामी दृष्टीकोन दिसून येतो.वंचित ,कष्टकरी ,कामगार ,अस्पृश्य ,स्त्रिया आणि नाहीरे वर्गाची तळमळ घेऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी अनेक ठोस निर्णय
बाबासाहेब यांनी घेतले आहेत.प्रसूती रजा,स्त्री-पुरुष समान वेतन कायदा ,स्त्री कामगार यांना पुरुषा इतके वेतन ,खाण कामगार स्त्री ला प्रसूती भत्ता ,मजूर व कष्टकरी स्त्रीला २१ दिवसाची किरकोळ रजा ,एक महिन्याची हक्काची रजा ,दुखापत झाली तर स्त्रीला नुकसान भरपाई ,२० वर्षाची सेवा झाल्यावर निवृत्ती वेतन तरतूद अशा तरतुदी मजूर मंत्री असताना बाबासाहेब यांनी केल्या होत्या.एकूणच संविधानिक समान हक्क ,समान संधी ,अभिव्यक्ती स्वातंत्र्य व इतर सर्व अधिकार ,स्त्रियांना समान न्याय व कायद्याचे मोफत सहाय्य ,प्रसूती सहाय्य ,कुटुंब नियोजन आग्रह ,विद्यार्थीनीना देखील बोर्डिंग मध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था ,संतती जन्मास घालणे ही स्त्रीची इच्छा,प्रौढ मताधिकारात पुरुषाबरोबरचा हक्क ,इत्यादी कितीतरी बाबी बाबासाहेबांनी केल्या आहेत.  बाबासाहेब यांची माणूस म्हणून असणारी समत्वाची दृष्टी व्यापक प्रमाणात आपल्याला जाणवते. तरीही आज अजूनही बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारया स्त्रिया तयार झाल्या नाहीत .याला कारण आजही धर्म व परंपरेचे वाहक स्त्रिया झाल्यात, अजूनही समाजात अदृश्य स्वरुपात जातीभेद शिल्लक असल्याने एका विचारी माणसांचा काय संकल्प होता हे स्त्रियाच नीट समजून घेत नाहीत.भ्रमिष्ट धार्मिक वातावरणात राहून गुंग होण्यापेक्षा बुद्धी प्रामाण्यवादी बाबासाहेब वाचून चांगला देश उभा राहण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांनी जागरूक होऊन देशोन्नती करावी लागेल. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई
यांना स्त्रियांचे शिक्षणाचे श्रेय आपण देतो संपूर्ण भारतीय स्त्रीला कायदेशीर अधिकार देण्यासाठी निकराचा संघर्ष करणारे महामानव बाबासाहेब होते. स्त्रियांच्या हक्काची पायमल्ली होऊ नये म्हणून पायमल्ली करणाऱ्या माणसाना कठोर शिक्षा व्हावी
ही त्यांची इच्छा होती. आज प्रसूती राजा ६ महिन्याची आहे पण बाबासाहेब यांनी याची सुरुवत १९२८ मध्ये केली. कायदा असूनही असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या गावच्या मजूर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने शेतकरी पगार देत नाहीत .पुरुषाला दिवसाला पगार जास्त तर स्त्रियांना कमी हा प्रकार खुले आम चालू आहे.हिंदू कोड बिल हे देशातीलच नव्हे तर जगातील अत्यंत महत्वाचे बिल आहे.यासरखे न्यायाचा कायदा अलीकडे होईल याची शक्यता देखील वाटत नाही. स्त्री -पुरुष लिंग भेद हा हिंदूचा खास रिवाज आहे त्यामुळे नुसते कायदे करणे म्हणजे शेणाच्या ढिगाऱ्यावर भारतीय संविधानाचा महाल बांधण्याचा खोटा दिखावा करण्याचा दांभिक प्रकार आहे असे बाबासाहेबांनी म्हटले आहे .समान नागरी कायद्याची बडबड करणारे स्वतःच्या धर्मातील स्त्री-पुरुषांना न्याय देणारा कायदा करायला विरोध करत राहिले होते . हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी
राजीनामा देत आहे असे म्हणणारे बाबासाहेब स्त्रीला सक्षम करण्यासाठी किती खंबीर होते हे समजून घ्यावे लागेल. आपल्या बापापेक्षा,प्रियकरापेक्षा ,नवऱ्यापेक्षा ,मुलापेक्षा आणि धर्मापेक्षा देखील बाबासाहेब स्त्रियांचे हितकर्ते होते यांची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि त्यांचा वारसा घेऊन डोळस होऊन समाजातली विषमता दूर केली पाहिजे. भारतात स्त्रियांच्या चळवळीला पुढे नेणारा एवढा बुद्धीप्रामाण्यवादी नेता त्या काळात झाला नाही आजही दिसत नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवून दलित स्त्रियांनी स्वतःत सुधारणा केली. उपेक्षित महिलांच्या परिषदा झाल्या.त्याची प्रेरणा घेऊन स्त्रियांच्या चळवळी झाल्या.
लाभार्थीला जाणीव नसणे,ही बाब चिंताजनक आहे. बाबासाहेब यांचे योगदान सर्वाना समजून सांगुन त्यांचे काम पुढे नेणे हीच त्यांना आदरांजली ठरेल .

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER