फलटण प्रतिनिधी - काका तुमचे ए.टी.एम.मधून पैसे निघत नाहीत, हे घ्या तुमचे ए.टी.एम.कार्ड, आम्हाला पैसे काढायचे आहेत, असे म्हणुन एका अनोळखी इसमाने ए.टी.एम.कार्ड मशिनमधुन नकळत हातचलाखीने पैसे काढून 1,76,351/- ची फसवणुक केल्याची माहिती फलटण शहर पोलिसांकडून दिली आहे.
या बाबत सविस्तर हकीकत अशी, दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वा.चे सुमारास एस.बी.आय. बँक ए.टी.एम. लक्ष्मीनगर, फलटण येथे फिर्यादी पोपट दत्तोबा साळुंखे, वय 57 वर्षे, व्यवसाय- शेती, रा.राजुरी (भवानीनगर), ता.फलटण, हे ए.टी.एम.मशिन मधुन पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे डाव्या बाजूला उभा राहिलेल्या अनोळखी इसमाने त्यांचे ए.टी.एम. कार्ड त्याच्या हातात घेऊन म्हणाला की, काका तुमचे ए.टी.एम.मधून पैसे निघत नाहीत, हे घ्या तुमचे ए.टी.एम.कार्ड, आम्हाला पैसे काढायचे आहेत, असे म्हणुन सदर अनोळखी इसमाने फिर्यादी चे ए.टी.एम.कार्ड मशिनमधुन काढले व नकळत हातचलाखी करून त्याचेकडील MADHU KAUDARE या नावाचे ए.टी.एम. फिर्यादीस दिले व फिर्यादीचे POPAT SALUNKHE या नावाचे ए.टी.एम.त्याच्याकडे घेऊन त्या ए.टी.एम. कार्ड मधून विविध ATM असलेल्या ठिकाणाहून पैसे काढून एकूण रू.1,76,351/- ची फसवणुक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार पूनम बोबडे करीत आहेत.