धैर्य टाईम्स : दि. ४ एप्रिल
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे माध्यमातून एकत्र फलटण शहरातील प्रभागांचा पाहणी दौरा नुकताच सुरू करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागासाठी 50 लाख रूपये व नविन नाट्यगृहा साठी 8 कोटी रूपये मंजुर झाल्याची माहिती यापूर्वीच देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज बुधवारपेठ प्रभाग क्रमांक 9 मध्ये पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील प्रत्येक प्रभागासाठी दिलेले 50 लाख रुपयांचे प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी जसे की गटर, पिण्याची पाईप लाईन व अंतर्गत बोळातील काँक्रीटीकरण करणे यासाठी खर्च करावयाचे आहेत अशा सूचना मा. खासदार रणजिसिंह ना. निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी दिलेल्या आहेत.
या दौऱ्यात गटनेते अशोकराव जाधव,भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे ,फलटण पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते , सुधीर अहिवळे( चेअरमन ), मा. नगरसेवक सचिन अहिवळे, अजय माळवे , फिरोज आतार फलटण शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहूल निंबाळकर, तानाजी कदम, अजिंक्य बेडके, राहुल पवार, राजाभाऊ शिरतोडे, ॲड. सचिन शिंदे, सुनील घोलप, बंडू भोई, गणेश माने, विठ्ठलआप्पा चोरमले, गोपी चोरमले, विजयराव चोरमले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.