फलटण - धैर्य टाईम्स : 5 एप्रिल
येथील नुकत्याच पार पडलेल्या फलटण वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. नितीन एन. जाधव यांनी अध्यक्षपदी तर सचिवपदी ॲड. निलेश भोसले व उपाध्यक्षपदी ॲड. सागर देशपांडे यांनी एकतर्फी विजय मिळवीला.
फलटण वकिल संघाच्या निवडणुकीत उमेदवार निहाय पडलेली मते पुढील प्रमाणे
अध्यक्षपदासाठी ॲड. सुजाता माने प्रधान (110 मते) ॲड. नितीन एन.जाधव ( 200 मते) बाद मते : 1 एकूण मते. :311 90 मताने ॲड. नितीन जाधव विजयी. उपाध्यक्ष पदासाठी ॲड. सागर देशपांडे ( 204 मते), ॲड. मेघा अहिवळे ( 104 मते,) बादमते 3 एकूण मते 311, ॲड. सागर देशपांडे 100 मतांनी विजयी.सचिव पदासाठी ॲड. निलेश भोसले (240 ) मते, ॲड. रेश्मा पठण (67 मते,) बाद मते 4 एकूण मते 311ॲड. निलेश भोसले 173 मतांनी विजयी झाले. तर सहसचिव ॲड.अभिषेक केदारनाथ राऊत, खजिनदारपदी ॲड. स्वरदा चंद्रकांत जाधव, सदस्य ॲड.निकिता नामदेव रसाळ, ॲड.निशा शंकरराव कदम हे बिनविरोध विजयी झाले. या विजयाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.