फलटण प्रतिनिधी -
धोम - बलकवडी, निरा - देवघर, एम. आय. डी. सी. या सारखे प्रकल्प ज्या नेत्यांनी तालुक्यातील जनतेला सुखी करण्यासाठी, तालूका सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केला व ज्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. त्यांचा ७६ वा वाढदिवस फलटण येथे दिनांक ३० मार्च गुढीपाडवा या दिवशी विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी दिली.
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस गुढीपाडवा या दिवशी साजरा होत असतो. याही वर्षी फलटण येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण शहराबरोबर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, अशा वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी दिली. महाराज साहेबांचा वाढदिवस हा एक प्रकारचा उत्सव असतो. याही वर्षी त्याचा वाढदिवस मोठया असा साजरा होणार असून तालुक्यातील सर्व जनतेने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लक्ष्मी-विलास पॅलेस, लक्ष्मीनगर, फलटण येथील निवासस्थानी दिनांक ३० मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ पर्यंत शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी शेवटी दिली.