Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आज फलटणची बत्तीगुल होणार - सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत मेंटेनन्स करीता विजपुरवठा राहणार बंद कृषिदुतांनी रांगोळीतुन रेखाटला विविध सुचीसह गावचा नकाशा जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी रिपाईच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना फलटण येथे अभिवादन प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता : सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड फलटणच्या एका अकॅडमीत विद्यार्थ्याला मारहाण : विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ग्राहक चळवळीत काम करणारांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव : डॉ. विजय लाड किरण बोळे यांना पुरस्काराचे वितरण पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजनबद्दल विडणी चे सरपंच सागर अभंग सन्मानित गं.भा.कै.लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा गुरुवारी 31 जुलै रोजी प्रथम पुण्यस्मरण आमदार सचिन पाटील यांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन : मतदारसंघाच्या समृद्धीसाठी शंभू महादेव चरणी प्रार्थना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर* *- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे कृषी विद्यार्थ्यांकडून डाळिंबावर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे बिबी येथे प्रात्यक्षिक विडणी - धुळदेवचे आजी माजी सदस्यांचा भाजपा प्रवेश - राजे गटाला जोरदार धक्का दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी महायुती सरकार पूर्ण ताकतीने उभे : आमदार सचिन पाटील नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्थेच्या राजाळे येथे वृक्षारोपण - आ. सचिन पाटील यांची उपास्थिती जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी फलटणमध्ये रक्तदान शिबिर जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांचे दुःखद निधन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची फलटणकरांना प्रतीक्षा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात दुसरी : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी स्वीकारला पुरस्कार धुमाळवाडीत पर्यटकांना लुटणा-या टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन अवघ्या आठ तासात पर्दाफाश ! पणन विभागाने सुपर मार्केट गाळा भाडे कमी करणेबाबत निर्देश दिलेस फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस मान्य- श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर नंदकुमार काकडे यांचे निधन बाजार समितीतील गाळे धारकांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश : मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती रिपाई ची राजकीय रणनीती संदर्भात शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी फलटण येथे बैठक : नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणूकीची रणनीती ठरणार बापूसाहेब तथा बी. टी. जगताप यांना राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचे विडमॅट प्रात्यक्षिक फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचे उल्लंघन ? अकॅडमी व्यवसाय उफाळले नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन करणार – सनी काकडे माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे मानेवाडी येथे प्रात्यक्षिक : युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती

थोर समाज सुधारक - महात्मा जोतिबा फुले

टीम : धैर्य टाईम्स
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते.

महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या The Right Of Man, Justice and Humanity, Common SenseThe Age of Reason या पुस्तकाचा प्रभाव होता.

जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री २ वाजता पुणे येथे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. यशवंत व राधा यांचा हा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.

महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये वयाच्या १४ व्य वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा जोतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत.

महात्मा जोतिबा फुलेंचे शैक्षणिक कार्य


१) अहमदनगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्रा. मिस फरारकडून प्रेरणा घेऊन ३ ऑगस्ट १९४८ रोजी जोतिबांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत ८ मुली उपस्थित होत्या. महात्मा जोतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्यध्यापिका बनविले. शूद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघून जोतिबांना त्यांच्या पत्नींसोबत गृहत्याग करावा लागला. यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात मुक्काम केला.

२) १८५० – ३ जुलै १८५१ रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, तर १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली. यानंतर १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरु केली. १८५२ साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पूना लायब्ररीची स्थापना केली.

३) १९ मे १८५२ रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली.

४) शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे (सध्याचे डेक्कन कॉलेज) प्रा. मेजर थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून जोतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.

५) महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर१८५३ मध्ये महार, मांग आदी लोकांना शिकविण्यासाठी ‘मंडळी’ नामक संस्था स्थापन केली. तर १९५५ मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली ‘रात्र शाळा’ त्यांनी स्थापन केली.

६) १८८२ साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर फुलेंनी साक्ष देऊन १२ वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा जोतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ होते.


महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा


१) १८९५ साली फुलेंनी वयाच्या२८ व्या वर्षी पुण्यात ‘तृतीय रत्न’ हे पहिले नाटक लिहिले. हे जोतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते.

२) २८ जानेवारी १८६३ रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंधगृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे १८७३ मध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला.

३) १८७७ साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळपीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच ‘व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची’ स्थापना केली.

४) विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला.

५) ८ मार्च १८६४ रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला.


महात्मा जोतिबा फुलेंचे साहित्य


महात्मा फुले यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.


तृतीय रत्‍न नाटक इ.स.१८५५

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा जून, इ.स. १८६९

विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी पोवाडा जून इ.स. १८६९

ब्राह्मणांचे कसब पुस्तक इ.स.१८६९

गुलामगिरी पुस्तक इ.स.१८७३

सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत अहवाल सप्टेंबर २४ , इ.स. १८७६

पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट अहवाल मार्च २० इ.स. १८७७

पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ निबंध एप्रिल १२ , इ.स. १८८९

दुष्काळविषयक पत्रक पत्रक २४ मे इ.स. १८७७

हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन निवेदन १९ ऑक्टोबर इ.स. १८८२

शेतकऱ्याचा असूड पुस्तक १८ जुलै इ.स. १८८३

महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत निबंध ४ डिसेंबर इ.स. १८८४

मराठी ग्रंथागार सभेस पत्र पत्र ११ जून इ.स. १८८५

सत्सार अंक १ पुस्तक १३ जून इ.स. १८८५

सत्सार अंक २ पुस्तक ऑक्टोंबर इ.स. १८८५

इशारा पुस्तक १ ऑक्टोंबर इ.स. १८८५

ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर जाहीर प्रकटन २९ मार्च इ.स.१८८६

मामा परमानंद यांस पत्र पत्र २ जून इ.स. १८८६

सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी पुस्तक जून इ.स. १८८७

अखंडादी काव्य रचना काव्यरचना इ.स. १८८७

महात्मा फुले यांचे उईलपत्र मृत्युपत्र १० जुलै इ.स. १८८७

सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक पुस्तक इ.स. १८९१ (प्रकाशन)

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER