भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी निंभोरे ते मुंजवडी दरम्यान भीमज्योतीचे आयोजन करण्यात आले असून ही भीमज्योत घेऊन मुंजवडी गावातील महिला मुली धावणार आहेत. या महिलांच्या भीमज्योतीची तालुक्यात चर्चा सुरु असून उद्या ठिकठिकाणी भीमज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे.
भिमरत्न तरुण मंडळ मुंजवडी यांच्या सौजन्याने मुंजवडी गावातील भिमकन्या व माता रमाईंच्या लेकींच्या आग्रहास्तव प्रतिचैत्यभूमी निंभोरे (ता. फलटण ) येथून सकाळी ठिक सहा वाजता महिला ज्योत घेऊन निघणार आहेत सकाळी आठ वाजता मंगळवार पेठफलटण मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे.यावेळी फलटण शहरातील भिमसैनिक उपासक उपासिका यांनी भिमज्योतीच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. यानंतर पिंपरद येथे सकाळी नऊ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव मंडळाच्या वतीने भिमज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. पुढे मुंजवडी येथे सकाळी अकरा वाजता भीमज्योत पोहोचणार असून त्याठिकाणी स्वागत करुन सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे.