Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

शहराचा पारा ४२ पार ? प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ ; प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही सूचना नाहीत

टीम : धैर्य टाईम्स

फलटण |धैर्य टाईम्स | २२ एप्रिल २०२५


फलटण शहराचे दोन दिवसांपूर्वी सर्वाधिक ४१ अंशावर असलेले तापमान मंगळवारी ४२ अंशावर गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. मंगळवारी तीव्र उष्णतेबरोबरच दिवसभर तीव्र उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या झळा वाढत आहेत. मात्र या बाबत नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हे अजूनही प्रशासनाने स्पष्ट करण्यात आले नाही. अशा वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. मात्र प्रशासनाला नागरिकांची काळजी आहे का ? उष्माघातासारखा प्रकार घडल्यास प्रशासनाकडून कोणती उपाययोजना केल्या पाहिजेत हे काही समजत नसल्याने फलटणच्या नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.


मार्च महिन्यात ३७ ते ३९ अंश तापमान नोंदविले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मात्र ढगाळ वातावरणाबरोबरच अवकाळी पावसामुळे तापमान घटले. एप्रिललाच्या पहिल्यां आठवड्यात शहराचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात शहराचे तापमान ३९ अंशावर कायम होते. मंगळवारी मात्र शहराच्या तापमानात वाढ होऊन ते ४२ अंशावर गेले. प्रशासनाकडून नागरिकांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आला नाही. 


उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान बाहेर जाणे टाळावे. पुरेसे पाणी घ्यावे, बाहेर पडताना छत्री, टोपीचा वापर करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. गरोदर महिला, वृद्धांनी अधिक काळजी घ्यावी, उन्हात अति कष्टाची कामे टाळावी, उच्च प्रथिनयुक्त आहार घेण्याची सूचनाही तज्ञांकडून दिली जात आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. 

शहरात वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. मंगळवारी तापमान चाळिशीपार पोहोचले.

मात्र ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृद्ध, गर्भवती, लहान बालकांना विशेष काळजी घेण्याची गरज असताना जिल्हा आरोग्य विभगाकडून जनजागृती अथवा उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.


भर उन्हात दुचाकीवर फिरताना त्वचेला दाह होतो. संपूर्ण शरीर झाकेल असे कपडे वापरा. भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी घरगुती शीतपेये घ्यावी. लस्सी, लिंबू-पाणी, ताक, उसाचा रस प्यावा. उन्हात फिरल्यावर अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर जाणवल्यास डॉक्टरांना दाखवा. घराबाहेर पडताना गॉगल, छत्री / टोपी, बुटांचा वापर करावा. प्रवासात पाण्याची बॉटल सोबत ठेवा असाही सल्ला तज्ज्ञ डॉक्टर सुभाष गुळवे यांनी दिला आहे.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER