Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस : बिरदेव डोणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल तालुक्याचा विकासाचा बॅकलॉक भरून काढणार - मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर शहराचा पारा ४२ पार ? प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ ; प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही सूचना नाहीत फलटण तालुका भाजपा मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर : अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विकास उर्फ बापूराव शिंदे यांना संधी डॉ. आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाला विलंब का ? आंबेडकरी अनुयायांचा प्रश्न डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी वाचनालयास पुस्तके भेट पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी - उपमुख्यमंत्री अजित पवार समोसे, जिलेबी, कचोरीला इंग्रजीत काय म्हणतात? खूप कमी लोकांना ठाऊक आहे इंग्रजी शब्द... चला तर मग गॅलेक्सीच्या चेअरमनपदी सचिन यादव तर व्हॉइस चेअरमनपदी योगेश यादव ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांचा उद्या साताऱ्यात गौरव समारंभ फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव हातचालखीने ए.टी.एम.कार्डचा वापर करुन पावणे दोन लाखाला गंडा फलटण शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार विविध समाजाने एकमेकांकडे पाहताना दृष्टिकोन बदलावा - सचिन मोरे कु. अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहिर तंत्रज्ञानाच्या युगात सावधान... MS-CIT शिकायचं आहे ! अधिकृत सेंटरलाच प्रवेश घ्या भीमज्योत घेऊन महिला धावणार - निंभोरे ते मुंजवडी भीमज्योतीचे आयोजन पिंपरद (ता. फलटण )येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन पदर आईचा अन् आयुष्याचा.... युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद : वापरकर्त्यांकडून प्रचंड तक्रारी महात्मा फुले यांना जन्मदिनानिमित्त तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडून अभिवादन फलटण येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉ. आंबेडकर जयंतीमंडळाच्या वतीने अभिवादन सांधे - दुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार : प्रसिद्ध अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ प्रसाद जोशी DD संह्याद्रीवर थोर समाज सुधारक - महात्मा जोतिबा फुले फलटण येथे भगवान महावीर जयंती उत्साहात संपन्न - आमदार सचिन पाटील यांनी केले अभिवादन बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आमदार सचिन पाटील टंचाई भागातील गावे पाण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी -पालकमंत्री शंभूराज देसाई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजन फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.नितीन जाधव तर सचिवपदी ॲड. निलेश भोसले मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी आर्थिक सहाय्यासाठी 7 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणेबाबत आवाहन डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील - उद्योग मंत्री उदय सामंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी एमएच-11 डि व्ही मालिका सुरु ; शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा जिवंत सातबारा मोहीम फलटण तालुक्यात प्रभावीपणे राबविणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव फलटण येथील प्रभाग ९ येथे पाहणी दौरा : प्रभागासाठी 50 लाख रूपये व नविन नाट्यगृहा साठी 8 कोटी रूपये मंजुर ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव : वारे व पावसात महावितरण ची यंत्रणा कोलमडली डॉ. आंबेडकर जयंती मंडळाकडून इफ्तारचे आयोजन : दलित मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन 1 एप्रिल रोजी सासवड येथे विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ - श्रीमंत रामराजे यांची प्रमुख उपस्थिती मनोज मारुडा यांची जिल्हास्तरीय समिती सदस्यपदी निवड आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस फलटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार : माजी आमदार दिपकराव चव्हाण महात्मा बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आवारातील गाळे भाडेतत्वावर - इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील अक्षय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सर्व अधिकार मिळवून देणार - जिल्हाधिकारी संतोष पाटील विजयकृष्ण थोरातने आर्चरी स्पर्धेत पटकावले ब्राँझ मेडल

पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 4: महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२" अभियानात शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव, ता-खटाव, जि-सातारा या शाळेने शासकीय शाळा गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून शासनामार्फत शाळेस ११ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे, अशी माहिती प्राचार्य विजय गायकवाड यांनी दिली.

शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव ही राज्य शासनाची निवासी शाळा आहे. विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक मिळाले असून त्याचा वापर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणार आहे.

 या अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या पायाभूत सुविधा शासन निर्णयांची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन - अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता चांगले आरोग्य, व्यावसायिक शिक्षणाची ओळख अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास, राष्ट्रीय एकात्मतेची भावना व्यक्तिमत्व विकासास चालना शासकीय विविध योजनांचा लाभ, या मुद्द्यांच्या आधारे शाळेचे मुल्यमापन करण्यात आले होते. शासकीय विद्यानिकेतनने वरील निकषांची पूर्तता करत यशाला गवसणी घातली आहे. शासकीय गटातील शाळेत आपली उंची मोठी केली आहे.या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच माझी विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य विजय गायकवाड साहेब, गृहप्रमुख चंद्रकांत नरळे, कुलप्रमुख प्रकाश खेडकर तसेच शासकीय विद्यानिकेतनचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या यशाला गवसणी घालण्यासाठी परिश्रम घेतले

 या यशाबद्दल कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मुजावर, शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी विभुते, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पालक व माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. 

ग्रामीण भागातील हुशार मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी 14 सप्टेंबर 1966 रोजी राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात पाच ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन सुरू केली. पुणे विभागातील शासकीय विद्यानिकेतन हे पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन शासकीय विद्यानिकेतन पुसेगावने पुन्हा एकदा भौतिक व शैक्षणिक सुविधांचा दर्जा राखण्यात यश मिळवले आहे. सातारा जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची जी संधी दिली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे  आभार प्राचार्य श्री विजय गायकवाड यांनी मानले.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER