फलटण | धैर्य टाईम्स | १८ एप्रिल २०२५
येथील गॅलेक्सी को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, फलटण या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन बबनराव यादव यांची पुनश्च एकदा चेअरमनपदी तर संस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी योगेश रघुनाथ यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी असणार आहे. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जे.पी. गावडे व साळुंखे होते.
गॅलेक्सी को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, फलटणचे संस्थापक चेअरमन सचिन बबनराव यादव यांची पुनश्च एकदा चेअरमन पदी व संस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी योगेश रघुनाथ यादव यांची निवड झाल्याबद्दल तसेच सर्व संचालक मंडळ यांचे के.बी.ग्रुप ऑफ कंपनीचे कर्मचारी यांचे वतीने अभिनंदन अभिनंदन करण्यात आले आहे.