कामाचा निर्धार आणि सतत विकासाची ओढ स्तंभांवर उभी असलेली सुरवडी ग्रामपंचायत आज ज्या वेगाने प्रगतीच्या वाटेवर आहे, त्यामागे प्रमुख भूमिका बजावणाऱ्या विद्यमान सरपंच सौ. शरयू जितेंद्र साळुंखे-पाटील. दूरदृष्टी प्रगल्भता व विकासात्मक नेतृत्व म्हणून फलटण तालुक्यात त्यांच्याकडे पाहिले जाते. आज मंगळवार दिनांक २ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न....
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे संस्थापक चेअरमन कै. नामदेवराव जाधव हे सौ. शरयू यांचे आजोबा. त्यामुळे राजकीय जाण, सामाजिक
बांधिलकी आणि जनसेवा यांचे बाळकडू त्यां
ना घरातूनच मिळाले. विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा विवाह ज्येष्ठ नेते मा. प्रल्हादराव (तात्या) साळुंखे-पाटील यांचे पुतणे व माजी सरपंच श्री. जितेंद्र साळुंखे-पाटील यांच्याशी झाला.
फलटण शुगर वर्क्स माजी चेअरमन व तालुक्यातील राजकारणाचे महामेरू प्रल्हादराव साळुंखे - पाटील यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी सौ शरयू यांच्यावर आली. साळुंखे पाटील घराण्यातील समाजकारण, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि लोकांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यांमुळे त्यांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळाली.
२०२३ ला झालेल्या सुरवडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सौ. शरयू पाटील या थेट सरपंच म्हणून निवडून आल्या. ही निवड केवळ राजकीय विजय नव्हे; तर गावकऱ्यांनी केलेला विश्वास, नेतृत्वावरची श्रद्धा आणि नव्या पिढीच्या सक्षम प्रशासनाची निवड होती. सौ. शरयू यांनी ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवत केवळ दोन वर्षात पाच कोटी पेक्षा अधिक विकास निधी गावासाठी आणला. जलजीवन मिशन, दलित सुधार योजना, बंदिस्त गटारे, स्वच्छता उपक्रम, अंतर्गत रस्ते यासारख्या महत्त्वाच्या कामावर त्यांनी विशेष भर दिला.
या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील व मा. प्रल्हादराव साळुंखे-पाटील (तात्या)यांच्या हस्ते पार पडले.
शरयू पाटील यांनी केलेल्या कामांची दखल जिल्हा व राज्यस्तरावरही घेतली गेली. त्यांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रशस्तिपत्र, लोकमत कर्तृत्ववान ‘नवदुर्गा २०२५’ पुरस्कार, ग्रामविकास विभागाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव यासह त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते सन्मान प्राप्त झाला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुरवडी ग्रामस्थ, महिला बचतगट, युवक, ज्येष्ठ नागरिक, तसेच तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



















