फलटण प्रतिनीधी - ठाकुरकी (ता. फलटण) येथे विवाहितेला तिच्यासह पतीला पाचजणांनी कोयता, लोखंडी फुकणी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकुरकी (ता. फलटण) येथे विवाहितेला दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ‘तू इथे नांदायचे नाही’ असे म्हणून तिच्यासह पतीला सासूसह इतर पाचजणांनी कोयता, लोखंडी फुकणी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद विवाहिता गुड्डी अंकुश चव्हाण (वय ३०, रा. ठाकुरकी ता. फलटण) हिने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. लक्ष्मी लालासो चव्हाण, लालासो गणपत चव्हाण, भाऊसो लालासो चव्हाण, संचिता अंकुश चव्हाण, लता अंकुश शिरतोडे (सर्व रा. ठाकुरकी, ता. फलटण) व बाबु लव्हा शिरतोडे (रा. धुमाऴवाडी, ता. फलटण) अशी आरोपींची नावे आहेत.या घटनेचा अधिक तपास म.पो.हवा. राणी फाळके करत आहेत.