फलटण प्रतिनिधि - फलटण - कोरेगाव (अ.जा.)विधानसभा मतदारसंघातून सचिन कांबळे - पाटील हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असून उद्या सोमवार दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता महायुती चे उमेदवार सचिन कांबळे - पाटील अर्ज दाखल करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्यरॅलीने उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महायुतीचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मागील अनेक दिवसापासून मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप पक्षाकडून सचिन कांबळे - पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी फार प्रयत्न केले परंतु सदर महायुती मधील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजे गट तसेच आमदार दीपक चव्हाण यांनी पक्ष सोडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करूनही फलटण कोरेगाव या विधानसभा मतदार संघावर दावा सोडला नव्हता.
नुकतीच मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेतली परंतु यामध्ये भाजप पक्षास अजित पवार यांनी फलटण कोरेगाव या विधानसभा जागा सोडली नसल्याने अखेर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सहकारी सचिन कांबळे पाटील यांची अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी उमेदवारी जाहीर केली.