Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

लग्नाच्या अमिषाने फसवणूक : नवरदेवाची आर्थिक लुट

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स \

दोन मुलांची आई असलेल्या महिलेशी लग्न लावून फलटण येथील लग्न न झालेल्या फिर्यादी शेतकरी नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत फलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे. नवरदेवाची आर्थिक लुट करणाऱ्या या पाच आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील शेतकरी असलेल्या एका ४४ वर्षीय फिर्यादीचे लग्न जमत नव्हते. बट्ट गोरे (रा. कुरवली ता. फलटण) या ओळखीच्या माणसाने फिर्यादींना छाया साठे हिचा नंबर देऊन ती लग्न जुळवण्याचे काम करत असल्याचे फिर्यादीस सांगितले असता फिर्यादीने छाया साठे या महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर छाया साठे व तिची साथीदार जयश्री शिंदे यांनी संगनमत करुन दोन मुले असलेल्या दिपाली जाणे या महिलेशी फिर्यादीचे आळंदी येथे लग्न लावून दिले. त्यावेळी त्यांनी फिर्यादीकडून २ लाख ७५ हजार रुपये घेतले. लग्नानंतर मात्र दिपाली जाणे ही सहा दिवसांतच फिर्यादीस आपल्याला दोन मुले असल्याचे सांगून निघून गेली.

त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने जयश्री शिंदे व छाया साठे यांच्याकडे दिलेले पैसे परत मागितले. त्यावर या दोघींनी त्यांना दुसरी मुलगी दाखवते, असे सांगून त्याकरता दीड लाख रुपयांची मागणी केली. चर्चेनंतर दि. २७ जानेवारी रोजी जयश्री शिंदे या शशिकला जाधव हिला नवरी मुलगी म्हणून फलटण एसटी स्टँडवर घेऊन आल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गजानन डाखोरे, सुमित्रा डाखोरे व गोकुळ लोंढे हे होते. मात्र संबंधित व्यक्ती नवरी मुलीचे नातेवाईक असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने ही बाब फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना सांगितली.

यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणी जयश्री दत्तू शिंदे (रा. चिखली डाखोरे, ता. हवेली, जि. पुणे), शशिकला तुकाराम जाधव (रा. चिखली ता. मंगळरूपीर, जि. वाशिम), सुमित्रा गजानन डाखोरे, गजानन नामदेव डाखोरे, गोकुळ ज्ञानदेव लोंढे (तिघे रा. तांदूळवाडी ता.जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली, तर दिपाली प्रभू जाणे (रा. पाटणादेवीरोड, रोशननगर ता. चाळीसगाव जि. जळगाव) व छाया साठे (रा. आळंदी जि. पुणे) या दोघी पसार झाल्या.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत असून या टोळीकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER