Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

भाजपातील थोर नेते जयकुमार गोरेच : आ. रामराजे यांचा टोला

टीम : धैर्य टाईम्स

फलटण( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी मध्ये सद्दस्थितीत अटलबिहारी वाजपेयी नंतर जर कोणी थोर नेते असतील तर ते आदरणीय जयकुमार गोरेच असतील आगामी काळामध्ये खासदार गटात फक्त स्वतः खासदार रणजितसिंह आणि त्याच्या भाऊ समशेरसिंह च शिल्लक राहतील बाकीचे आपल्याकडे येतील किंवा घरी बसतील असा टोला विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला. फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक माजी जिल्हापरिषद सदस्य महादेव कोंङिराम पोकळे यांनी श्रीमंत रामराजे यांच्या उपस्थिती त राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला .त्यावेळी श्रीमंत रामराजे बोलत होते यावेळी आमदार दिपकराव चव्हाण , जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , मार्केट कमिटीचे माजी चेअरमन श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की , राजकारणाच्या तत्कालीन परिस्थितीनुसार तुम्ही पूर्वी वेगळे होता . जर आपण तालुक्यांचे राजकारण चांगल्यांच्या हातात दिले नाही तर पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार नाही.जिल्ह्यात काम करून घेण्याची पध्दत आपण सुरू केली. दिल्लीत गेल्यावर स्व . यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याला ओळखले जाते. अशा या जिल्ह्यामध्ये आता कोणत्या प्रकाराचे नेते तयार होत आहेत हे नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांना विकासाची व प्रश्नांची जाण असली पाहिजे . गटात असावे किंवा नसावे पण सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी कायमच राष्ट्रवादी सर्वसामान्यांच्या पाठिशी उभी आहे . तालुक्यातील खासदारांच्या कार्यपध्दतीनुसार तालुक्यातील आगामी काळात खासदारांच्या गटामध्ये खासदार स्वतः व त्यांचे बंधू समेशरसिंह ना . निंबाळकरच शिल्लक राहतील. त्यांचे बाकीचे कार्यकर्ते आपल्याकडे येतील किंवा घरी बसतील , असा टोलाही रामराजेंनी खा . रणजितसिंह ना . निंबाळकर यांना नाव न घेता लगावला. ते म्हणाले , मागील काही दिवसांपूर्वी आदरणीय गोरेसाहेब म्हणत होते की , आता या उतरत्या वयात नातवंडांसोबत बसा, मी नातवंडांसोबत बसू शकतो परंतु, मला त्यांना एक विचारायचे आहे की तुम्हाला मुल व संसार किती हे स्पष्ट करा आणि मग नातवंडे किती हे सांगा , असाही टोला श्रीमंत रामराजेंनी लगावला. 

खासदारांचा धंदा एकच आहे तो म्हणजे नवं जुनं करणं आपल्या तालुक्यातील नागरिकांना माहित नसेल पण किचनमधील मिक्सर किंवा अवजारे दुरूस्त करायचा डिप्लोमाचं कदाचित माझ्याकडून डिप्लोमाच नाव चुकत असेल हे खासदारांच शिक्षण झालं आहे. खासदारांचे शिक्षण कुठे झाले ? हे शोधावे लागेल. आता तालुक्यामध्ये तडीपारीची केस फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांवर का ? सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सध्या चालू आहे . असे काही केले तरी व खासदारांनी कितीही ठरवले तरी तालुक्यातील नागरिकांचे मनपरिवर्तन करण्यामध्ये खासदार कधीही यशस्वी होणार नाहीत, अशी टीकाही श्रीमंत रामराजेंनी खा . रणजितसिंह यांच्यावर केली.

सातारा जिल्ह्याचे असल्या लोकांमुळेच नाव खराब होत आहे. गोरे व खासदार हे दुक्कल मुंबईमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून असतात व तेथूनच जिल्ह्यातील व तालुक्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असतात . कोरेगावच्या कॉरिडॉर एमआयडीसीचा निर्णय हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी घेतला आहे. राज्याची व केंद्राची एमआयडीसी हे वेगळे प्रकल्प असतात. त्यामध्ये म्हसवडलासुध्दा एमआयडीसी होवू शकते. फलटणला राज्याचीच एमआयडीसी आहे. परंतु , फलटणला आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू आहेतच ना ?, असेही श्रीमंत रामराजे म्हणाले.

खासदार गटातला तो पट्ठ्या कोण?

राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर माझी जि. प सदस्य महादेव पोकळे यांनी बोलताना खासदार गटात एकअसा पट्ट्या आहे ज्याची निवडून येण्याची पात्रता नाही, पण बिनविरोध म्हणले की सर्वात लाईनीच्या पुढे, निवडणूक लढवायचे म्हणले की सगळ्यात मागे, जो उचलाव आहे तालुक्याचा ज्याच्याशी काही संबंध नाही असल्या माणसांमुळे संपूर्ण खासदार गट संपणार असल्याचा घनाघात महादेव पोकळे यांनी केला. यावेळी तो खासदार गटातील पट्ठ्या कोण अशी चर्चा सुरु होती.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER