Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

रामराजे तुमच्या डोक्यातील मस्ती जिरवायची वेळ आणू देऊ नका : खासदार रणजिसिंह यांचा घणाघात

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :

श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी जव्हारच्या कुबड्या घेणाऱ्या श्रीमंत रामराजे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांचे पाय काढण्याची भाषा करतात तर बोलल्याप्रमाणे तुम्ही करून दाखवाच असे आवाहन देतानाच फलटणची जनता तुमच्या कमरेला लंगोटी सुद्धा ठेवणार नाही व मला बोलला तर मी गप्प बसणार नाही त्यामुळे तुमच्या डोकयातील मस्ती जिरवायची वेळ आणू देऊ नका असा घणाघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला ते हॉटेल जॅक्सन इन ( सुरवडी) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, श्रीराम सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा असून दरवाढ मागणी हा त्यांचा हक्क आहे, असे असताना सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या ऊस दरवाढीच्या मागणीवरून रामराजे यांनी वरील वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचा खासदार रणजीतसिंह यांनी पलटवार करत रामराजे यांचा समाचार घेतला.

गेली पंधरा वर्षे श्रीराम कारखान्याचा हिशोब नाही, कर्ज किती आहे हे माहिती नाही, जमीन विकूनही कर्ज किती असे सवाल उपस्थित करतानाच वार्षिक भाडे 12 ते 13 कोटी मिळणे अपेक्षित असताना आज दिड कोटी व्याज देऊन कारखान्याला फक्त पन्नास लाख रुपये मिळतात याचे आश्चर्य व्यक्त करतानाच आपला भोंगळ कारभार व पैशाचा भ्रष्टाचार न कळण्याएवढे आम्ही दूध खुळे आहोत का असा सवाल यावेळी खासदार रणजितसिंह यांनी उपस्थित करीत वार्षिक सभा दादागिरी करत घेता जर तुमचा कारभार पारदर्शक असेल तर तुम्ही दादागिरी का करता असे यावेळी खासदार रणजितसिंह म्हणाले.

 फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ, फलटण तालुका खरेदी विक्री संघ हे बंद पाडले तर साखरवाडी कारखान्याचे वाटोळे करत मालोजीराजे सहकारी बँक बुलढाणा बँकेत चालवण्यासाठी दिली केवळ यावरच रामराजे थांबले नसून स्वराज साखर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत माझ्यावर राजकीय षडयंत्र करणाऱ्या रामराजेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटतेय असे खासदार रणजितसिंह यांनी सांगतानाच श्रीराम पेक्षा स्वराज ऊसाला जादा दर देत असून स्वराज वर बोलण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचे टीकास्त्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोडले.

 नीरा - देवघरच्या कामाचे टेंडर निघाले असून फलटण - बारामती रेल्वेचे काम सुरू झाले आहे तर धोम - बलकवडी हा प्रकल्प बारा महिने लवकरच कार्यान्वित होत असून फलटण - पुणे रेल्वे सेवा सुरूच असून पुणे पंढरपूर महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून शेकडो कोटींचे कामे आपण फलटण तालुक्यासाठी केले असल्याचे शेवटी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER