फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रणय महादेव जगताप या विद्यार्थ्याने कराड येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय गोळा फेक मैदानी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल प्रणय जगताप याचे विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे सेक्रेटरी तथा स्कूल कमिटीचे चेअरमन संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्या सौ. संध्या फाळके यांनी अभिनंदन केले. प्रणय याला मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सुहास कदम आणि कुमार पवार यांचे मार्गदर्शन लाभले.