म्हसवड कोविड सेंटरवर उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांना माणदेशी फौंडेशनतर्फे माणदेशी चॅम्पीयनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांच्याहस्ते रोगप्रतिकार शक्ती वाढवणार्या फळे आणि खाऊच्या प्रदार्थाचे वाटप करण्यात आले.
म्हसवड कोविड सेंटरवर उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांना माणदेशी फौंडेशनतर्फे माणदेशी चॅम्पीयनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांच्याहस्ते रोगप्रतिकार शक्ती वाढवणार्या फळे आणि खाऊच्या प्रदार्थाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रभात सिन्हा म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सामाजिक बांधिलकीतून गरजूंना नेहमी मदत करणार्या म्हसवड येथील माणदेशी फौंडेेशन संस्थेनेही जनजागृतीसह गरजूंना अन्नधान्य पुरवण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर मास्कही उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनामुळे जगभरात मोठे संकट उभे राहिले असताना केंद्र व राज्य शासन, समाजातील अनेक घटक सामाजिक संस्था या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माणदेशी फौंडेशनने यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभुमीवर संस्थेच्या वतीने गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य गोरगरीबांचे अन्नपाण्यावाचून हाल होऊ नये, म्हणून प्रत्येक गरजूंच्या घरी जाऊन माणदेशी बैंक व फौंडेशनचे कर्मचारी त्यांना घरपोच जीवनावश्यक वस्तूचे पैकेट देत होते. कारण या महामारीच्या काळात कोणीही उपाशी राहणार नाही, हा या मागचा आमचा उद्देश आहे. आज पुन्हा गेल्यावर्षी सारखीच परिस्थिती निर्माण झाली असून कोरोना संसर्गाची दुसरी लाटच आल्याचे दिसून येत आहे. माणदेशी फौंडेशनने गोंदवले येथे उभारलेल्या कोविड सेंटरवर ही रूग्णांची संख्या वाढली असून तेथील कोरोना रूग्णांना अत्याधुनिक उपचारासहित फौंडेशनतर्फे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकस व पोष्टीक आहारासहित फळे व प्रतिकारशक्ती वाढवणारी खाऊचे प्रदार्थ दिले जाताहेत त्याच पध्दतीने आज म्हसवड येथील कोविंड सेंटरवर उपचार घेणार्या रुग्णांना फळे, सफरचंद, पोष्टीक प्रदार्थ काजू, बदाम, खजूर यासारखी आम्ही रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी खाऊचे किट देत आहोत असेही यावेळी सिन्हा म्हणाले.
यावेळी म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. काकडे, खंडेराव सावंत, कुशल भागवत, सारंग नवाळे, बंटी पंतगे उपस्थित होते.