Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - मटका, जुगार, चक्री, आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना पोलिस अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्यात महत्त्वाची भूमिका असलेली स्थानिक गुन्हे शाखा वसुलीच्या कामात गर्क असून फलटण मधील तरुण वर्ग गुटखा व जुगाराच्या आहारी गेला असून शहरातील अनेक भागात अवैध धंद्याचा जोर वाढला आहे.

शहरात धूम स्टाइलने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे, जबरी चोर्‍या व घरफोड्या हे गुन्हे नित्याचे झाले आहेत. शहरात मटका जोरात सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण पुरवण्यात येत आहे. खुद्द पोलिस अधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानाकडे तसेच पोलिस ठाणाकडे जाणाऱ्या परिसरात टपरीवर मटका व गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. स्थानिक पोलिसांशी संगनमत करून खुलेआम मटका चालतो असा आरोप नागरिक करत आहेत.

फलटण शहरात जुगाराचे मोठे अड्डे असून ठरावीक रक्कम पोलिसांना दरमहा पोहोच केली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. शहराच्या मध्यवस्तीत राजरोसपणे जुगार, चक्री सुरू असताना पोलिस दुर्लक्ष करतात. तर कोळकी, जाधववाडी अशा भागातही खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत.शहरात मटक्याच्या अनेक टपर्‍या सुरू आहेत. त्यांच्याकडून दरमहा हजारो रुपये घेतले जातात. जुगाराचे मोठे अड्डे सुरू असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड केली जाते. तर चक्री सारखे खेळ शहराच्या मध्यवस्तीस्त सुरु आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या अवैध धंद्याने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. 

अनेक टपरीवर उघडपणे गुटखा विक्री होत आहे.तरुण युवकांना गुटखा दारूसह मटक्याचे व्यसन जडले आहे. अवैध धंद्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेक व्यक्‍तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. मात्र या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून महिला व युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कामगार व तरुण युवकांना दारू, मटका, गुटखा यांचे व्यसन जडले असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे या अवैध धंद्यावर करवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची अथवा निवेदन देण्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिस उद्धटपणे बोलत असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.


जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख लक्ष देणार का? 
जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी फलटण शहरातील अवैध व्यवसायाला पोलिसांचे अभय मिळत असताना कोणती भूमिका घेणार याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे. सुसंस्कृत फलटण शहराला अकार्यक्षम व अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शहर वासियांना संकटाना सामोरे जावे लागत आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER