मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मिरडे गावचे रहिवासी असणारे राज काळे यांच्या मुंबई भूषण पुरस्कार सन्मानाने फलटण तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे
सांगली येथील ग्लोबल फाउंडेशन आयोजित संस्थेच्या वतीने इंटरनॅशनल ट्रेनर राज काळे यांना मुंबई भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सामाजिक,शैक्षणिक, राजकीय, क्रीडा,कला सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पुणे येथील अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम मध्ये हा पुरस्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मुंबई येथील आर के बिझनेस ऑफ कंपनीचे चेअरमन, इंटरनॅशनल ट्रेनर व मोटिवेशनल स्पीकर राज काळे यांना मुंबई भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ट्रेनर राज काळे यांना मुंबई भूषण पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मिरडे गावचे रहिवासी असणारे राज काळे यांच्या मुंबई भूषण पुरस्कार सन्मानाने फलटण तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे