Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

साखर कारखान्याच्या दूषित पाण्याने होळ येथे लाखो मासे मृत : नदीच्या पाण्याला आले गटाराचे स्वरूप

तीन दिवसात शेकडो मृत माशांची विक्री
टीम : धैर्य टाईम्स

सद्यस्थितीला राज्यात नदी प्रदूषण मुद्दा गाजत असताना नीरा नदीत प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडून पाणी दूषित झाल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी राज्य सरकार कोणती कडक भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

होळ ता फलटण येथील ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडले असून संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

निरा नदी पाणी दूषित तक्रारीबाबत काही दिवसापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहणी केली होती. त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची टीम पाहणी करणार होती. याबाबत भाजपने विषयाला गांभीर्याने घेतले होते नदी प्रदूषणाला केवळ साखर कारखानेच जबाबदार नसून बारामती, फलटण तालुक्यांतील कारखान्यांसह अन्य कंपन्या जबाबदार आहेत असा आरोपी नदीलगतच्या शेतकऱ्यांनी केला होता.

बारामती आणि फलटण या दोन तालुक्यांच्या सीमेवरून नीरा नदीचे पात्र वाहत आहे. परंतु खासगी व सहकारी प्रकल्पातील रसायन मिश्रित सांडपाण्याने गेली अनेक वर्षे नीरा नदीतील पाण्याचे प्रदूषण होत आहे. विशेषतः शेती उद्धवस्त करणारे हे प्रदूषण रोखणे आव्हाणात्मक ठरत आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदी लगतच्या ग्रामपंचायतींसह शेतकऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केल्याची नोंद आहे. परंतु संबंधित मंडळाने फारशी दखल न घेतल्याने यंदाही नदीमध्ये प्रचंड प्रदुषित पाणी वाढत चालले आहे.

रसायन मिश्रित व मळी मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता ओढ्याद्वारे नदीत सोडले जात असल्याने नदीतील पाण्याला हिरवा रंग चढायला लागला असून पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. तसेच मासेही मोठ्या प्रमाणात मृ्त्युमुखी पडत आहेत. याशिवाय नदीच्या खराब पाण्यामुळे नदी काठच्या जमिनीवर क्षाराचे थर येऊन ती नापीक होत आहे. पिकांची वाढ खुंटत आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत चालला आहे.

नीरा नदी परिसरातील काही युवक तीन दिवसांपासून हे मृत मासे पकडून टेम्पोचे टेम्पो भरून भिगवण या ठिकाणी विक्रीस पाठवीत आहेत. रासायनिक पाण्यामुळे मृत्यू झालेल्या मासे खाल्ल्याने जर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालास तर याला जबाबदार कोण? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात दूषित पाणी निरा नदीत सोडल्या बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित कारखान्यावर कारवाई करणार का? असा सवाल होळ येथील ग्रामस्थ विचारत असून या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसुद्धा असह्य झाले असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER