Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

राजे गटाचे कंबरडे मोडले : रणजितसिंह नगरपालिकेवर झेंडा फडकवणार!

टीम : धैर्य टाईम्स

फलटण (प्रतिनिधी) — फलटणच्या राजकारणात गेली तीन दशकांहून अधिक काळ वर्चस्व राखणाऱ्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाला यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधानसभेतील पराभवानंतर राजे गटाची राजकीय पकड ढासळल्याचे स्पष्ट संकेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसू लागले आहेत.


नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. राजे गटातील माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक सोमशेठ जाधव, विक्रम जाधव, सनी अहिवळे, सुदामराव मांढरे, भीमदेव बुरुंगले यांच्यासह पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा तसेच इतरांनी घटक पक्षात केला आहे. हे सर्व प्रवेश रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याने “फलटण नगरपालिकेवर रणजितसिंह यांचा झेंडा फडकणार” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


शहरातील तरुण, व्यापारी आणि उद्योजक वर्ग रणजितसिंह यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आणि आरोग्य विषयक अडचणी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी नवीन नेतृत्वाची गरज असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.


राजे गटात नाराजी वाढली


रामराजेंच्या गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये अनेक मतभेद व नाराजी असून, अनेकांनी गट सोडण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या असंतोषामुळे राजे गटाचे संघटनात्मक बळ कमकुवत झाल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षे निष्ठेने कार्य केलेले कार्यकर्ते आता अन्य गटांमध्ये जात असल्याने राजे गटाचे “कंबरडे मोडले” अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.


रणजितसिंह यांचा वाढता प्रभाव


माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखली असून, प्रत्येक प्रभागात स्वतंत्र संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यांनी शहरात विकासाचे नवे मॉडेल सादर करत तरुणांना राजकारणात आणण्याचे धोरण स्वीकारले आहे.

त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या घटकांमध्ये समन्वय वाढत असून, दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन प्रचाराची तयारी करत आहेत.


शहरातून उमटलेल्या प्रतिक्रिया


शहरातील नागरिकांमध्ये “आता बदल हवा”, “नव्या नेतृत्वाला संधी द्या” अशा प्रतिक्रिया उमटत असून, नगरपालिकेत बदलाची चाहूल लागल्याचे स्पष्ट होत आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनी “दीर्घकाळ एका गटाने सत्ता उपभोगली, पण शहराचा विकास ठप्प झाला. आता रणजितसिंह यांच्या नेतृत्वातून नवे अध्याय सुरू होऊ शकतात” असे मत व्यक्त केले आहे.


एकंदरीत, फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा “राजे विरुद्ध रणजितसिंह” अशी थेट लढत रंगणार असून, पहिल्यांदाच राजे गटाच्या वर्चस्वाला गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो हे येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल; ऐन थंडीत मात्र शहरातील राजकीय वातावरण मात्र तापलेले दिसत आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER