फलटण प्रतिनिधी -
बाणगंगा धरण परिसरात वाखरी गावाच्या हद्दीत आकडा टाकून वीज चोरी केल्या प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरण ने दणका देत थेट पंचनामा करीत कारवाई केली.
दरम्यान वाखरी परिसरात एका कंपनीने तब्बल सहा महिने वीज चोरून वापरली जात होती,यावेळी तेथील शेतकऱ्यांनी ही बाब समोर आणली तसेच तेथील लाईनमन म्हणजे वायरमन व अधिकारी तब्बल वीस हजार रुपयांचा हप्ता घेतात अशी कुजबुज सुरु होती,मात्र ही बाब काही पत्रकारांच्या समोर येताच थेट वाठार निंबाळकर येथील महावितरणचे अधिकारी चिंदे यांना सोबत घेत थेट कारवाईसाठी समक्ष घेऊन गेले त्याठिकाणी तिथून जाणाऱ्या एलटी लाईन वरून अनधिकृतपणे वीज चोरी केली जात होती,त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी 40 फूट वायर ताब्यात घेतली व त्या ठिकाणच्या ट्यूब, फॅन, कुलर तसेच बल्ब व इतर वापरत असलेल्या वस्तूंचा पंचनामा केला व साधारण एक किलो वॅट वीज वापर होत असल्याचे दिसून आले व त्या प्रमाणे त्यांना वीज बिल व इतर दंड असे 7300 रुपयांचे वीज देयक,दिले ते 24 तासांच्या आत न भरलेस गुन्हा दाखल करण्यात येईल असे सूचित केले आहे..










