फलटण प्रतिनिधी :
फलटणचे सुपुत्र सिनियर राष्ट्रीय हॉकी खेळाडू प्रदीप प्रकाशराव ननवरे वय वर्षे 41 व सद्या कार्यरत असलेले क्राइम ब्रांच पोलीस भोईवाडा पोलीस ठाणे मुंबई हे मुंबई येथून ऑफिस कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे कर्तव्य बजावत असताना दि.२८ (शनिवारी) सायं ७.०० वा.त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले.त्यांच्या पञ्चात आई,पत्नी,मुलगी,मुलगा,भाऊ,भावजय असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव संभाजीनगर येथुन जाधववाडी ता. फलटण येथील निवास्थानी पोहचे पर्यंत विविध ठिकाणी पोलीस ठाण्याच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. जाधववाडी ता. फलटण येथील निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेविले असताना सातारा जिल्हा पोलीस दला मार्फत मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमी फलटण येथे करण्यात आले.अंत्यसंस्कारवेळी भोईवाडा पोलीस ठाणे,फलटण ग्रामीण व शहर पोलिस ठाणे, सातारा जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच हवेत बंदुकीच्या गोळ्यांची फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.यावेळी पोलीस अधिकारी,राजकीय व सामाजिक पदाधिकारी, मित्रपरिवार आदी उपस्थित होते.
प्रदीप यांनी शालेय जीवनात फलटण एज्युकेशन सोसायटी व राज्य पोलिस हॉकी संघ माध्यमातून हॉकी स्पर्धेत अनेक उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले यामुळे अनेक पदके,पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.ते पत्रकार बाळासाहेब ननवरे यांचे पुतणे होत.