भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फलटण येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व याठिकाणी फळे वाटप करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सातारा (पूर्व) जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, महासचिव अरविंद आढाव, फुले, शाहू, आंबेडकर विचार विद्वत्तेचे जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, फलटण तालुका अध्यक्ष संदीप काकडे, फलटण शहराध्यक्ष उमेश कांबळे, फलटण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.अश्विनी अहिवळे, फलटण शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.सपनाताई भोसले, जिल्हा सदस्य आनंदराव आढाव,आनंद निकाळजे, दौलत अहिवळे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.