Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा म्हणजे बोरीचा बार : ॲड. निकम यांचा घणाघात

टीम : धैर्य टाईम्स

16000 पेक्षा जास्त सभासद व 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारा फलटणच्या श्रीराम कारखान्याचा जवाहर उद्योगा बरोबर नव्याने 15 वर्षाचा करार केवळ नोटरीच्या आधारे केल्याचा खळबळजनक दावा यावेळी ॲड. निकम यांनी केला. अंदाजे 5 लाख टन हंगामी ऊस गाळप असणारा श्रीराम कारखान्याला पूर्वीच्या करारानुसार 120 रुपये प्रति टनाने 6 कोटी रुपये प्रति हंगाम मिळत होते मात्र आता झालेल्या नवीन करारानुसार प्रति हंगाम श्रीरामला केवळ दिड कोटी रुपये मिळणार असल्यामुळे यातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे ॲड.निकम यांनी निदर्शनास आणून दिले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामातून माढा लोकसभा मतदार संघ आता राज्यसह देशात वेगळी ओळख निर्माण करत आहे. नुकतेच पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी 1200 कोटी तर निरा -देवघरसाठी 3976 कोटींचा निधी मंजूर झाल्याने फलटणच्या राज्यकर्त्यांनी पत्रकार परिषदा त्यांचबरोबर वाठार - निंबाळकर व गोखळी येथे शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्या मधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी खासदार रणजितसिंह यांना शिव्या शाप देत बोरिचा बार भरवल्याचा घणाघात फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष व जेष्ठ विधिज्ञ् ॲड. नरसिंह निकम यांनी केला. ते विडणी (फलटण ) येथे झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क दौऱ्याच्या आभार सभेत बोलत होते.

यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, विठ्ठल नाळे, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, उपाध्यक्ष तुकाराम ढमाळ, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे,जाकीर मणेर, शहराध्यक्ष अमोल सस्ते,विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, निंभोरेच्या सरपंच कांचन रणवरे,बाळासाहेब ननावरे, तुकाराम शिंदे,अमित रणवरे,सचिन ननावरे,भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत,विडणी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड. निकम म्हणाले गुजरातने आपल्या राज्याच्या जाहिराती करिता जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमले आहे त्याचपाद्धतीने फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची जाहिरात करण्या करीता राजघराण्यातील उच्चविध्याविभूषित रामराजे हे खासदारांचे ब्रँड अँबेसिडर म्हणून विना पगार काम करीत आहेत, खासदारांनी रामराजे यांना त्यांच्या या कामाचे मानधन द्यावे असे टोला ॲड.निकम यांनी लागवला.

मंत्री पदासाठी फलटणच्या जनतेची गद्दारी व विश्वासघात करीत फलटण तालुका बारामतीकरांना गहाण ठेवल्याने 27 वर्ष फलटण तालुक्याला झुलवत ठेवत रामराजेंमुळे हा तालुका तब्बल 54 वर्ष मागे गेल्याचा सणसणीत आरोप यावेळी ॲड. निकम यांनी केला.

निरा -देवघर प्रकल्प माजी आमदार कै. कृष्णचंद्र भोईटे यांनी एजेंड्यावर घेत तत्कालीन मुख्यमंत्री कै.वसंतदादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन केल्याचे निदर्शनात आणून देत माजी आमदार कै. चिमणराव कदम यांचेही योगदान असल्याचे सांगून माजी खासदार कै.हिंदुराव नाईक निंबाळकर व सुभाषराव शिंदे यांनी शिखर -शिंगणापूर येथून पदयात्रा काढली होती आणि आता खासदार रणजितसिंह यांनी निरा -देवघर प्रकल्पासाठी 3976 कोटी निधीची तरतूद केल्याने प्रकल्प पूर्णत्वात गेल्याचे ॲड. नरसिंह निकम यांनी निदर्शनास आणून दिले.

16000 पेक्षा जास्त सभासद व 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारा फलटणच्या श्रीराम कारखान्याचा जवाहर उद्योगा बरोबर नव्याने 15 वर्षाचा करार केवळ नोटरीच्या आधारे केल्याचा खळबळजनक दावा यावेळी ॲड. निकम यांनी केला. अंदाजे 5 लाख टन हंगामी ऊस गाळप असणारा श्रीराम कारखान्याला पूर्वीच्या करारानुसार 120 रुपये प्रति टनाने 6 कोटी रुपये प्रति हंगाम मिळत होते मात्र आता झालेल्या नवीन करारानुसार प्रति हंगाम श्रीरामला केवळ दिड कोटी रुपये मिळणार असल्यामुळे यातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे ॲड.निकम यांनी निदर्शनास आणून दिले. तर श्रीराम साखर कारखाना दुसऱ्याला चालवायला देणाऱ्यांनी खासदार रणजिसिंह यांच्या साखर कारखान्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे टिकस्त्र निकम यांनी सोडले.

आमदार दिपक चव्हाण यांना संपर्क कार्यालय सुद्धा सुरु करू दिले नसल्याने हे केवळ सरमजामशाहीचं धोतक असल्याचे सांगत फलटण तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल तर येऊ घातलेला निवडणूकांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ताकत उभी करा असे आवाहन यावेळी ॲड. निकम यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER