फलटण प्रतिनिधी :- हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र या संघटनेची मान्यतेने सातारा जिल्ह्यामध्ये दि हॉकी सातारा ही संघटना कार्यरत असून या संघटनेचे हॉकी प्रशिक्षक सागर कारंडे यांची ओडिसा (राऊलकिला) येथे दि.४ ते १४ मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तेराव्या हॉकी इंडिया सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धा सन २०२३-२४ मध्ये भाग घेणाऱ्या महाराष्ट्र सबजिनीयर महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
हॉकी महाराष्ट्र संघटनेने महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मैदानावरती आयोजित केलेली होती. सदर निवड चाचणी मध्ये अनुराधा ठोंबरे हिने अत्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्राच्या संघामध्ये आपले स्थान निश्चित केले तसेच या संघाला प्रशिक्षक म्हणून दी हॉकी साताराचे सागर कारंडे यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्याची माहिती बी हॉकी सातारा संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे वरिष्ठ हॉकी प्रशिक्षक तसेच निवड समिती सदस्य दि हॉकी साताराचे मुख्य प्रशिक्षक महेश खुटाळे सर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
सागर कारंडे व अनुराधा ठोंबरे यांची निवड झाल्याबद्दल तसेच त्या खेळाडूचे प्रशिक्षक सचिन धुमाळ सर व खुरंगे सर व मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य माननीय गंगावणे सर या सर्वांचे मा. सभापती,विधान परिषद माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार माननीय दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा मनोज भोरे, सचिव मा मनीष आनंद, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा सदस्य, प्रवीण गाडे, महेंद्र जाधव, पंकज पवार यांनी खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.