फलटण प्रतिनिधी:- सुनेबरोबर बाचाबाची का करत आहेस असे म्हणून एकाने कुऱ्हाडीच्या दाड्याने व हाताने मारहाण पती पत्नीस मारहाण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मौजे दुधेबावी ता. फलटण गावाच्या हद्दीत फिर्यादी पार्वती तानाजी मदने (रा. दुधेबावी ता फलटण जि सातारा) यांचे मारका मळा नावचे शेतात काम करत असताना फिर्यादीचे दीर शिवाजी भगवान मदने हे तू माझे सुनेबरोबर बाचाबाची का करत आहेस असे म्हणून त्यांचे हातात असले कुऱ्हाडीच्या दांडा फिर्यादीचे डावे मांडीवर मारला व भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादीचे पती तानाजी मदने हे तेथे आले असता त्यांनाही शिवीगाळ दमदाटी करून करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवाजी भगवान मदने (राहणार दुधेबावी, ता फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार करीत आहेत.