फलटण प्रतिनीधी:- बेकायदेशीर जमाव जमवून दोन जणांना मारहाण केल्या प्रकरणी सात जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मोजे राजुरी ता. फलटण जिल्हा सातारा गावाच्या हद्दीत यातील आरोपी विनोद किसन सांगळे यांनी फिर्यादी ज्ञानदेव आनंद गावडे (रा. राजुरी ता. फलटण जि.सातारा) यांच्या पुतण्याची नेमण्यात आलेली कुस्ती थांबवली या कारणावरून चिडून जाऊन संशयीत आरोपी विनोद किसन सांगळे, दर्पण बाळासो सांगळे,यशराज विनोद सांगळे, धीरज शरद सांगळे, रोहन उर्फ पिनू अंकुश सांगळे,बाळासो येंकू शेंडगे, सोनबा येंकू शेंडगे सर्व (रा. राजुरी ता.फलटण. जि.सातारा) यांनी फिर्यादी ज्ञानदेव आनंद गावडे व त्यांचा मुलगा पंकजाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने संगममताने जीवेघेणा हल्ला केल्या प्रकरणी विनोद किसन सांगळे, दर्पण बाळासो सांगळे,यशराज विनोद सांगळे, धीरज शरद सांगळे,रोहन उर्फ पिनू अंकुश सांगळे, बाळासो येंकू शेंडगे, सोनबा येंकू शेंडगे (सर्व रा. राजुरी ता.फलटण. जि.सातारा) यांच्या विरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्याकडील जावक क्रमांक १११५/२०२४ दिनांक २८ अन्वये रिपोर्ट प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि.रानगट करत आहेत.