फलटण प्रतिनीधी :- धुळदेव येथील गट नंबर 45 मधील देवस्थान इनाम वर्ग जमिनीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बिनशेती वापर तसेच अनेक वेळा सील करण्यात आलेला आर के चव्हाण कंपनीचा आर.एम.सी प्लांट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही फलटण उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसिलदार व शहर पोलीस प्रशासन यांच्या मूकसंमतीने इतरत्र हलवला गेल्याने शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात गेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळदेव येथील गट नंबर 45 मधील देवस्थान इनाम वर्ग जमिनीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून बेकायदेशररित्या बिनशेती परवानगी नसताना आर.के.चव्हाण कंपनीने महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच पोलीस प्रशासन यांना हाताशी धरत आर.एम.सी प्लांट सुरू केला याबाबात अनेक लेखी तक्रार अर्ज उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना दिले गेले यानंतर दोनदा मंडळअधिकारी धुळदेव व तलाठी धुळदेव यांनी हा प्लांट सील केला होता तरीही महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी , तहसिलदार तसेच पोलीस प्रशासन यांच्या वरदहस्ताने दोनदा सील तोडून प्लांट सुरुच ठेवण्यात आला होता.
पुन्हा याबाबत तक्रार दाखल होताच धुळदेव येथील गट नंबर 45 मधील प्लांट आर.के.चव्हाण कंपनी विरोधात शहर पोलीस स्टेशन येथे महसूल विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सील तोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल विभागाचे सील असताना तसेच गुन्हा दाखल असताना त्या ठिकाणी असणारा सर्व मुद्देमाल आर.एम.सी प्लांट इतरत्र हलवला जाणार आहे तसेच महसूल विभागाचा दंड व पोलीस गुन्हातील पंचनामा तसेच चार्टशीट न्यायालयात दाखल होईपर्यंत सर्व मुद्देमाल आर.एम.सी प्लांट इतरत्र हलवला जाऊ नये असे लेखी स्वरूपात दाखल करूनही उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मूकसंमतीने सदरच्या प्लांट इतरत्र हलवला गेल्याने शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात गेला आहे तसेच दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल हलवला गेला असल्याने महसूल विभाग व पोलीस प्रशासनाची पुढील कारवाई रोखले गेले आहे.
फलटण तालुक्यात पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी गेली चार वर्ष कोणालाही न जुमानता बेभानपणे बेकायदेशीर कामे करत असून बेकायदेशीर उत्खनन बेकायदेशीर, गौण खनिज वाहतूक, बेकायदेशीर बिनशेती वापर, महसूल बुडवणे इत्यादीचा सपाटा सुरू आहे. याबाबत तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी दाखल होऊनही कागदी घोडे हकण्यात तरबेज असणाऱ्या महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनीस वाटेल तसे व वाटेल त्या प्रकारे सहकार्य सुरू ठेवले आहे.
उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी आर.एम.सी प्लांट हलवणार असल्याची पूर्व कल्पना असतानाही महसूल दंड व चौकशी प्रलंबित असताना तसेच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही मेहरबानी दाखवत आर.एम.सी प्लांट इतरत्र हलवण्यास मदत केली असल्याची चर्चा सुरू आहे. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख हे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शहा सारखी गप्प बसणार की जबाबदार सर्व अधिकारी वर्गावर कारवाई करणार हे येणाऱ्या काळात कळेलच...
लाखोंचा बुडालेला दंड उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, मंडल अधिकारी धुळदेव व तलाठी धुळदेव यांच्या कडून वसूल करण्याची मागणी