यापूर्वीच महाराष्ट्रातील विविध भागातील नेव्ही आर्मी मध्ये नोकरीला लावतो असे सांगून अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा तोतया नेव्ही अधिकारी आकाश डांगे याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
यासंबंधी सविस्तर माहिती अशी, शिंदेवाडी खुंटे ता. फलटण येथील आदित्य संदीप यादव वय 22 वर्ष व्यवसाय शिक्षण यास आकाश काशिनाथ डांगे वय 28 वर्ष राहणार भाडळी बुद्रुक ता. फलटण जि. सातारा याने नेव्ही मध्ये भरती करतो असे आश्वासन देऊन दहा लाख रोख स्वरूपात घेऊन बनावट इंडियन नेव्ही जॉइनिंग लेटर ,गेट पास, ट्रेनिंग अकॅडमी कार्ड देऊन त्यावर बनावट शीक्के मारून व बनावट सही करून फसवणूक केली आहे. याचा अधिक तपास धोंगडे करीत आहेत.