लोणंद : तरडगाव ता. फलटण येथील एका विवाहित महिलेस घरातून हाकलून देत माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये अन्यथा रॉकेल ओतून पेटवून देऊ अशी धमकी दिल्याप्रकरणी नवऱ्यासह अन्य चार जणां विरोधात लोणंद (सातारा )पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संबंधित सविस्तर वृत्त असे, तरडगाव ता. फलटण येथील सौ. मोनाली रोहित खुंटे वय, 29 यांनी पहिल्या बाळंतपणासाठी झालेला खर्च रुपये चार लाख, व नवऱ्याला शेती व गाडी व्यवसाय भांडवले करता एक लाख रुपये माहेरून घेऊन येण्यासाठी पती रोहीत किरण खुंटे, सासरा किरण शिमवराम खुंटे, सासू मनीषा किरण खुंटे यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केला असून, दिर भूषण किरण खुंटे जाऊ तृप्ती भूषण खुंटे यांनी घरातून हाकलून देत अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल संतोष नाळे करीत आहेत