फलटण प्रतिनिधी : पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. १७) रोजी सकाळी ११:०० वाजता फलटणमध्ये झरदारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले.
फलटण शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खा. रणजितसिंह यांच्या प्रमुख उपस्थित एकत्र येवुन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानी विदेश मंत्र्याचा जाहिर निषेध केला.
पाकिस्तानी मंत्र्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची लायकी नसुन मोदींची इमेज विश्वव्यापी आहे अशा नेत्यावर त्यांनी बोलणे म्हणजे स्वत:हुन पाकिस्तानवर संकट ओढवुन घेणारी कृतीच म्हणावी लागेल. यापुढे बोलताना त्यांनी विचार करून बोलावे अन्यथा याचा गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार असल्याचा इशारा खा. रणजितसिंह यांनी यावेळी दिला आहे.
जोडमारो व पुतळा दहन आंदोलनात शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.